पावस जिल्हा परिषद गटावर ठाकरे सेनेचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस जिल्हा परिषद गटावर ठाकरे सेनेचे वर्चस्व
पावस जिल्हा परिषद गटावर ठाकरे सेनेचे वर्चस्व

पावस जिल्हा परिषद गटावर ठाकरे सेनेचे वर्चस्व

sakal_logo
By

rat२२२९.txt

(पान २ साठी)

(लोगो) गट

ग्रामपंचायतीत ठाकरे सेनेचे वर्चस्व

पावस जिल्हा परिषद गट ; मावळंगे, गणेशगुळेतील पराभवाने भाजपाला धक्का
सकाळ वृत्तसेवा ः
पावस, ता. २२ ः पावस जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे सेनेने आपले वर्चस्व राखले आहे. गेली अनेक वर्षे ताब्यात असलेली मावळंगे ग्रामपंचायत भाजपच्या हातून गेल्यामुळे भाजपाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
या जिल्हा परिषद गटांमध्ये मावळंगे ग्रामपंचायत केली अनेक वर्ष भाजपप्रणित पॅनेलच्या अधिपत्याखाली होती. यावेळी ठाकरे सेनेने आव्हान निर्माण केले. ठाकरे सेनेने पाच ग्रामपंचायत सदस्य कायम ठेवून सरपंचपद मिळवले. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रथम ठाकरे सेनेचा झेंडा फडकला आहे. गणेशगुळे ग्रामपंचायतीवर २०१७ मध्ये भाजपाने वर्चस्व मिळवले होते. परंतु या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. मुळात दोनच सदस्य रिंगणात उतरले होते, ते पराभूत झाले आणि भाजपला एका सदस्यावर समाधान मानावे लागले.

बाळासाहेबांची शिवसेना प्रथमच रिंगणात उतरल्यानंतर सहा सदस्य व एक सरपंच मिळवून गणेशगुळे ग्रामपंचायतीवर प्रथमच आपला झेंडा फडकवला आहे. पूर्णगड ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचा सरपंच बसला असून फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. सहा जागांवर शिंदे गट व भाजपाने वर्चस्व मिळवले. गावडेआंबेरे ग्रामपंचायतीत गाव पॅनेलच्या माध्यमातून सहा सदस्य बिनविरोध झाले होते. उरलेल्या तीन जागांसाठी निवडणूक झाली असून त्यामध्ये ठाकरे सेनेचे तीन उमेदवार निवडून आले. तिरंगी लढतीमध्ये गाव पॅनेलचे लक्ष्मण सारंग निवडून आले आहेत. गोळप जिल्हा परिषद गटातील निरूळ ग्रामपंचायत ग्रामस्थांनी सर्वपक्षीय मतभेद बाजूला ठेवून गाव पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध केली. मात्र विद्यमान सरपंच या ठाकरे गटाच्या मानल्या जातात. परंतु गाव पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे तिथे पक्षाचा प्रश्न आलेला नाही. चांदोर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा ठाकरे सेनेने आपले वर्चस्व निर्माण केले असून नऊपैकी सहा जागा व एक सरपंचपद निवडून आल्याने त्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. शिंदे गट व भाजप युतीला तीन जागा मिळाल्या आहेत. २०१७ मध्ये भाजप प्रणित पॅनेलचे चंद्रकांत तरळ थेट सरपंच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती होऊन त्यांची कन्या या निवडणुकीत थेट सरपंच निवडणुकीत पराभूत झाली आहे.


निधी नसल्याने पदाधिकाऱ्यांची अडचण

गणेशगुळे, मावळंगे येथील निकालाचा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र दोन ग्रामपंचायती भाजपच्या हातून गेल्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेदाचा परिणाम झाल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण प्रत्येक गावामध्ये भाजपाचे मतदार आजही स्थिर असून त्यांना गती व निधी देण्याचे काम होत नसल्यामुळे त्यांची अडचण निर्माण होत आहे.