
स्पर्धेत शाळेचे यश
rat२२३३.txt
( पान ५ साठी)
कसबा हायस्कूलचे स्पर्धेत नेत्रदी यश
संगमेश्वर ः कसबा येथील न्यू इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजमधील वैभव रमेश जाधव आणि तेजल चंद्रकांत बालदे या दोन खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावर मजल मारली आहे. विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या वैभव जाधव व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तेजल बालदे या खेळाडूंचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. उंच उडीत कुमार रुपेश सुभाष गुरव या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १०० मिटर व २०० मिटर धावण्याच्या तालुकास्तरीय स्पर्धेत आदित्य अनिल गुरवने तृतीय क्रमांक पटकावला. ४०० मिटर रिले तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यालयाच्या संघांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. साने गुरुजी तालुकास्तरीय कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेत धनश्री नवनाथ साळवीने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. माध्यमिक गटात मयुरी मनोहर महाडिकने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. प्राथमिक गटातून शुभंकर श्रीपाद फाटकने कथाकथन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.