
देऊळवाडी-मसुरे सोसायटीस प्रिंटर
swt2225.jpg
70331
मसुरेः सोसायटीस उद्योजक डॉ. दीपक परब यांनी प्रिंटर भेट दिला.
देऊळवाडी-मसुरे सोसायटीस प्रिंटर
मालवण, ता. २२ : देऊळवाडा-मसुरे सेवा सोसायटी मसुरे या संस्थेस मसुरे गावचे सुपुत्र उद्योजक डॉ. दीपक परब यांनी कार्यालयीन कामासाठी आवश्यक प्रिंटर भेट दिला. यापुढेही सोसायटीस आवश्यक मदत करण्यात येईल, असे डॉ. परब यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पारकर, बागवे हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण, पंढरीनाथ मसूरकर, विठ्ठल लाकम, रमेश पाताडे, सचिव शिवानी मसदेकर आदी उपस्थित होते. डॉ. परब यांचे डॉ. साठे यांनी आभार मानले.
................
डेगवे ग्रामस्थांची रविवारी सभा
बांदा, ता. २२ ः डेगवे येथील प्रसिद्ध ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव ६ फेब्रुवारीला होणार आहे. या जत्रोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन करण्यासंदर्भात सर्व मानकरी, ग्रामस्थ, दुकानदार, व्यावसायिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन रविवारी (ता. २५) सकाळी साडे दहा वाजता मंदिरात केले आहे. या बैठकीत दुकानदारांची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव स्थापेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने केले आहे.
....................