काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर यांचे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर यांचे निधन

sakal_logo
By

swt2226.jpg
70332
विजय कुडतरकर

काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते
विजय कुडतरकर यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः राष्ट्रीय काँग्रेसचे सातार्डा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुडतरकर (वय ७८) यांचे निधन झाले.
माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले. अखेरपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले होते. या पक्षाचे माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांचे ते जवळचे कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात काम केले. सातार्डा हे गाव महाराष्ट्र सीमेवर असल्याने या ठिकाणी काम करत असताना माजी मंत्री भाईसाहेब सावंत हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना रस्ताकामासाठी भाईसाहेब सावंत यांना पटकळणीच्या फुलांचे हार घालून प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यांची सामाजिक तळमळ पाहून भाईसाहेब सावंत यांनी त्यांना आपल्यासोबत घेतले. त्यानंतर काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बनले. सातार्डा ते न्हयबाग-गोवा या पुलासाठी त्यांनी उपोषणे, आंदोलने केली. या पुलाचे उद्‍घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते केले होते. या पुलासाठी कुडतरकर यांचे योगदान मोठे आहे. ''एनरॉन'' या प्रदूषणकारी प्रकल्पाविरोधात त्यांनी स्टॅलिन दयानंद यांच्यासोबत काम केले. सामाजिक कार्यात अखेरपर्यंत ते सक्रिय होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या वेळेस पोलिस प्रशासनाने सातार्डा-देऊळवाडी येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नवनिर्वाचित सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.