रत्नागिरी-सुधारित निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सुधारित निधन वार्ता
रत्नागिरी-सुधारित निधन वार्ता

रत्नागिरी-सुधारित निधन वार्ता

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२२p१७.jpg- KOP२२L७०३४१ओळी ः डॉ प्रशांत खेडेकर..
-----

हरहुन्नरी कलाकार डॉ. खेडेकर यांचे निधन
रत्नागिरी ः शहरातील साळवी स्टॉप येथील हर हुन्नरी कलाकार डॉ. प्रशांत शशिकांत खेडेकर (वय ४८) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी (ता. २२) निधन झाले. डॉ. खेडेकर हे नेत्र चिकित्सक अधिकारी म्हणून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत होते. गुरुवारी सकाळी ते तालुक्यातील खानू येथून संगमेश्वरकडे कॅम्पसाठी जात असताना अचानक त्यांना खानू-मठ येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. तातडीने सहकारी डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी पाली रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झाले. रत्नागिरीसह ग्रामीण भागातही नेत्र चिकित्सक म्हणून ते प्रचलित होते. डॉ. प्रशांत यांना कराओके ट्रक वर गाण्याचा छंद होता. व्हाईस ऑफ किशोरकुमार म्हणून ते रत्नागिरीत प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा-मुलगी, आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे.

फोटो ओळी
-rat२२p२५.jpg- शरयु घटे
---
शरयू घटे
दाभोळ : दाभोळ येथील शरयू अनंत घटे (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दाभोळ येथील साळीवाडा परिसरात त्या मामी या नावाने ओळखल्या जात होत्या. त्यांच्या मागे पती, ३ मुलगे असा परिवार आहे. दाभोळ येथील वृत्तप्रतिनिधी स्वप्नील घटे यांच्या त्या मातोश्री होत.
----
फोटो ओळी
-rat२२p२६.jpg- शशिकांत पोंक्षे

शशिकांत पोंक्षे
साडवली : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे रहिवासी व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत उर्फ बाळ पोंक्षे (वय७२) यांचे निधन झाले. शिक्षक गौरव पोंक्षे यांचे ते वडील होत. शशिकांत पोंक्षे हे २००७ ते २०१७ या कालावधीत आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. १० वर्षे ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष होते. ते आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण मंदिराचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे, जावई, सून असा परिवार आहे.