रत्नागिरी-संक्षिप्त ः क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त ः क्राईम पट्टा
रत्नागिरी-संक्षिप्त ः क्राईम पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त ः क्राईम पट्टा

sakal_logo
By

हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळणाऱ्या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा बाळकृष्ण पंडित (वय ४७, रा. नाणीज-तळवाडी, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २१) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला ही विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीसाठी बाळगल्या स्थितीत सापडली. या प्रकरणी पोलिस नाईक राकेश तटकरी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
---------
कसोप येथे वृद्धाची आत्महत्या
रत्नागिरी ः शहराजवळील कसोप येथे शाळेजवळील पुलाच्या रेलिंगला दोरीने गळफास घेऊन वृद्धाने आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुधाकर कृष्णा मयेकर (वय ७७, रा. कसोप-भंडारवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २२) सकाळी साडेसहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध कसोप-शाळेजवळील पुलाच्या रेलिंगला दोरी बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

---------
नागरबुडी येथे १८ लिटर दारु जप्त
दाभोळ : दापोली शहरातील नागरबुडी परिसरात दापोली पोलिसांनी छापा मारून ९५० रुपये किमतीची १८ लिटर गावठी दारू जप्त केली. संशयिताविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास दापोली पोलिसांचे पथक नागरबुडी परीसरात गस्त घालत असताना त्यांना अशोक मोहिते यांच्या घराच्या मागील बाजूस आडोशाला एक व्यक्ती प्लास्टिक कँन घेऊन बसलेला दिसला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना कँनमध्ये गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव संकेत कृष्णा मोहिते (वय ३७, रा. नागरबुडी) असल्याचे सांगितले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून संशयित संकेत मोहिते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----
नगर पंचायतीच्या साहित्याची चोरी
दाभोळ : दापोली नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाचे दुरुस्तीचे सामान अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली नगरपंचायतीची शहरातील काळकाई कोंड परिसरात पाण्याची टाकी असून तेथेच जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्राच्या दरवाजाची कडी उचकटून अज्ञात चोरट्याने त्या खोलीतील ३५ हजार ५०० रुपये किमतीची साहित्य २ ते १७ डिसेंबर या कालावधीत चोरून नेली, या प्रकरणी तक्रार पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख स्वपील महाकाळ यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल वैशाली सुकाळे करत आहेत.