रत्नागिरी-गाळ उपसा कधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-गाळ उपसा कधी
रत्नागिरी-गाळ उपसा कधी

रत्नागिरी-गाळ उपसा कधी

sakal_logo
By

rat२२४०.txt

(पान ३ साठी) मेन

मांडवी जेटी-भाट्ये खाडीतील गाळ उपसा कधी?

मच्छीमारांचा सवाल ; पालकमंत्र्यांचे आदेश तरी पाळणार ना
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २२ : शहराजवळील मांडवी जेटीपासून ते भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ तातडीने काढण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबारात संबंधित खात्याला दिले होत्या. त्यानुसार पत्तन विभाग, मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हा गाळ कधी उपसणार, असा प्रश्न आता मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे.

शहराजवळील राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छीमारांच्या नौका समुद्रात ये-जा करण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख आहे. मांडवी जेटीकरून जाणारा हा एकमेव मार्ग आहे. परंतु तो गाळाने भरलेला असून मार्गात खडकही आहेत. त्यामुळे मच्छीमारांसाठी जाणाऱ्या किंवा येणाऱ्या नौकांसाठी हे मार्ग आता धोकादायक बनला आहे. या गाळामुळे अनेक बोटींचे अपघात होऊन खलाशी दगावले आहेत. तसेच बोटींचेही नुकसान झाले आहे. अनेकवेळा छोट्या, मोठ्या बोटी गाळात अडकल्याचे प्रकार घडत आहेत. म्हणून स्थानिक मच्छीमारांकडून गाळ उपसण्याची तसेच बंधारा घालण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडे केली जात आहे.
पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे जनता दरबारातही गाळाचा प्रश्नाबाबत जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने मागणी केली होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सामंत यांनी तत्काळ याची पाहणी करून गाळ काढण्यासाठी ड्रेझर बोलवावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. याला अनेक महिने उलटले तरी त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पत्तन विभाग तसेच मेरिटाईम बोर्डाकडून गाळ उपसण्याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने मच्छीमारांचे मत आहे. त्यामुळे अनेक मच्छीमार नाराज आहेत. गाळ न काढल्यास पुढील मासेमारी मोसमात मासेमारीसाठी हा मार्ग बंद होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तरी संबंधित विभागाने तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा मच्छीमार संघटनेने दिली आहे.