समाजाभिमूख दृष्‍टीकोन ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजाभिमूख दृष्‍टीकोन ठेवा
समाजाभिमूख दृष्‍टीकोन ठेवा

समाजाभिमूख दृष्‍टीकोन ठेवा

sakal_logo
By

70430
वागदे : येथील श्रमसंस्कार शिबिराचे उद्‌घाटन डॉ.राजश्री साळुंखे यांनी केले. यावेळी डॉ.राजेंद्रकुमार चौगुले, विनायक मेस्त्री, रूपेश आमडोसकर आदी.

समाजाभिमूख दृष्‍टीकोन ठेवा

डॉ.राजश्री साळुंखे ः कणकवली कॉलेजचे वागदेत श्रमसंस्कार शिबिर


कणकवली, ता.२३ : विद्यार्थ्यांनी समाजाभिमूख दृष्‍टीकोन ठेवावा. देशाच्या प्रगतीमध्ये युवा नेतृत्‍व महत्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांनी त्‍यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिखर गाठण्याचा प्रयत्‍न करावा, असे आवाहन कणकवली कॉलेज संस्थेच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे यांनी केले.
येथील कणकवली कॉलेजच्या राष्‍ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर वागदे येथील गोपुरी आश्रमात सुरू झाले. उद्‌घाटन प्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होत्या. यावेळी सरपंच रुपेश आमडोसकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. खंडागळे, गोपुरी आश्रम अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, संचालक विनायक मेस्त्री, सदाशिव राणे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, प्रा. युवराज महालिंगे, प्रा. मंगलदास कांबळे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिर व्यक्तिमत्व विकासासाठी एक संधी आहे. या माध्यमातून ध्येयवेड्या व्यक्तींना व्यासपीठ मिळते. रुपेश आमडोसकर यांनी एनएसएस अंतर्गत वागदेत केलेल्या कामांचे कौतुक केले. कार्यक्रमप्रसंगी श्री. खंडागळे, श्री. मेस्त्री, प्रा. महालिंगे, प्रा. मुंबरकर, प्रा. कांबळे यांनी शिबिरार्थींना शिबिर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. हर्षदा कुबल, मनीष कलिंगण यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.