
तनिष्का आडिलकर बुद्धिबळात प्रथम
तनिष्का आडिलकर
बुद्धिबळात प्रथम
कणकवली,ता. २३ ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, ओरोस यांच्यामार्फत आयोजित कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा व जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तनिष्का आडीलकर ही जिल्ह्यात प्रथम तर वैष्णवी तवटे ही द्वितीय आली.
यशस्वी विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे, सुधीन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजेश्री साळुंखे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू , अध्यक्ष दत्तात्रय तवटे, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे, पर्यवेक्षक पी. जे. कांबळे यांनी अभिनंदन केले.