कलमठ सरपंच, सदस्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलमठ सरपंच, सदस्यांचा सत्कार
कलमठ सरपंच, सदस्यांचा सत्कार

कलमठ सरपंच, सदस्यांचा सत्कार

sakal_logo
By

७०५०४
कणकवली : येथील नगराध्यक्ष दालनात नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी कलमठ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्‍कार केला. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)

कलमठ सरपंच, सदस्यांचा सत्कार
कणकवली : कलमठ गावच्या सरपंचपदी संदीप मेस्त्री यांच्यासह इतर भाजपचे सदस्य मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले. त्‍यांचा कणकवली नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी आज नगराध्यक्ष दालनात सत्‍कार केला. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आणि इतर नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक अभी मुसळे, शिशिर परूळेकर, संजय कामतेकर तसेच नवनिर्वाचित सदस्य पप्पू यादव, स्वप्नील चिंदरकर, बाबू नारकर, अमजद शेख, आबा कोरगावकर, अमोल चिंदरकर आदी उपस्थित होते.
---
७०४६३
कुडाळ ः राऊळ महाविद्यालयात चर्चासत्रास प्रतिसाद मिळाला.

राऊळ महाविद्यालयात चर्चासत्र
कुडाळ ः जागतिक अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त येथे आयोजित चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चर्चासत्रात डॉ. व्ही. जी. भास्कर, डॉ. कॅप्टन एस. टी. आवटे, प्रा. पी. डी. जमदाडे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी सहभाग घेतला. चर्चा सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. पी. डी. जमदाडे यांनी अल्पसंख्याक समाजाला आपल्या संविधानात अल्पसंख्याक वर्गांसाठी कोणत्या सवलती, सुविधांची तरतूद करण्यात आली आहे, याची विस्तृत माहिती दिली. प्रा. डॉ. झोडगे यांनी महाविद्यालयात साजऱ्या होणाऱ्या विविध दिनांचे औचित्य सांगितले. समाजामध्ये सलोखा व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे जबाबदारी पाळण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. डॉ. भास्कर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. कॅप्टन आवटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. आर. रॉड्रिक्स यांनी आभार मानले. या चर्चासत्रात बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.
...............
७०४५८
मयुरेश नाईक

मयुरेश नाईकचे कॅरममध्ये यश
सावंतवाडी ः रत्नागिरी येथे झालेल्या शालेय विभागीय कॅरम स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात येथील आरपीडी हायस्कूलचा विद्मार्थी मळगाव गावचा सुपुत्र मयुरेश नाईक उपविजेता ठरला. त्याची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत निवड झाली. त्याने या अगोदर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क़मांक पटकावला होता. याआधी त्याने राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याला योगेश फणसळकर, हरिष नार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
ृ--
वेंगुर्लेत बॅ. खर्डेकर पुण्यतिथी
वेंगुर्ले ः येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात सोमवारी (ता. २६) बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांना ५९व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी स. का. पाटील महाविद्यालय, मालवणचे माजी प्राचार्य श्रीपाद गिरसागर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी व वेंगुर्लेवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी केले आहे.