नाणीजला राजरोस दारूधंदे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाणीजला राजरोस दारूधंदे सुरू
नाणीजला राजरोस दारूधंदे सुरू

नाणीजला राजरोस दारूधंदे सुरू

sakal_logo
By

नाणीजला राजरोस दारूधंदे सुरू
महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; दारूमुक्ती केंद्र परिसरात अड्डे
रत्नागिरी, ता. २३ ः तालुक्यातील नाणीज-तळीवडी येथे बेकायदेशीर दारू बाळगल्याप्रकरणी नुकतेच एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नाणीज हे तीर्थक्षेत्र असून येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण दारू सोडण्यासाठी येतात, असे असताना बेकायदेशीर दारूची विक्री होत आहे. त्यामुळे येथील सर्व बेकायदेशीर दारूधंदे बंद करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
अनेकवेळा तक्रारी देऊनही नाणीजला ५-६ ठिकाणी राजरोसपणे बेकायदेशीर दारूची विक्री केली जाते. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नाणीज तळवाडी येथील पंडित नामक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसनाईक राकेश तटकरी यांनी तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.दारू विक्रीविरुद्ध वेळोवेळी महिलांनी आवाज उठवला आहे. पोलिसांनीही अनेकवेळा छापे टाकून कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत; मात्र हे व्यवसाय कायमस्वरूपी बंद होत नाहीत. गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. रसायनयुक्त ही हातभट्टीची दारू अनेकांच्या जीविताला हानिकारक ठरत असून काहींचा मृत्यू झाला आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दारूची उधारी न चुकवल्यांच्यावर वसुलीसाठी जबरदस्ती केली जाते, अशाही तक्रारी आहेत.
पोलिसांच्या कारवाईनंतर नाणीजमध्ये पाच-सहा वर्ष धंदा बंद होता. त्यानंतर या महिलेने पुन्हा जुन्या मठासमोर दारूधंदा सुरू केला आहे. नाणीजची दारू कायमस्वरूपी बंद करण्याबाबत पोलिस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत. पोलिसही अनेकवेळा छापे टाकतात. कारवाई करतात; पण हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होत नाही. तो बंद करण्याची मागणी होत आहे.