मी सामंत यांचा कट्टर समर्थक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी सामंत यांचा कट्टर समर्थक
मी सामंत यांचा कट्टर समर्थक

मी सामंत यांचा कट्टर समर्थक

sakal_logo
By

rat२२१०.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो-
rat२२p१.jpg-
७०२३७
रत्नागिरी- थेट निवडुण आलेल्या वेतोशी ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण झोरे यांनी आपण उदय सामंत समर्थक असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिंदे गटाचे तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, पप्पु सुर्वे, नेताजी पाटील आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
-----

मी उदय सामंत यांचा कट्टर समर्थक

वेतोशीचे सरपंच अरुण झोरे; ठाकरे सेनेचा दावा फोल
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २२ : मी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत याचा कट्टर समर्थक आहे. त्यांच्यासाठी वेळ पडल्यास सरपंचपद सोडून देईन, अशी स्पष्ट भुमिका वेतोशीचे नवनिर्वाचित सरपंच अरुण झोरे यांनी व्यक्त केली. ठाकरे सेनेनेही वेतोशी ग्रामपंचायतीचा सरपंच आपलाच असल्याचा दावा केला होता. त्याला त्यांनी हे उत्तर दिले आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल २० तारखेला जाहीर झाला. यावेळी अनेकांनी अनेक ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. यामध्ये ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना अशी ही चढाओढ आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींची निकाल जाहीर झाल्यानंतर वेतोशी ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे उमेदवार अरुण झोरे हे ४९० मतांनी निवडुन आले आहेत. ठाकरे सेनेने वेतोशी ग्रामपंचायत आमचीच असल्याचा दावा करत झोरे यांच्या बरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय बने, संजू साळवी आदी दिसत आहेत. यावरून अरुण झोरे नेमके कोणत्या गटाचा असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र झोरे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत याला पुर्णविराम दिला आहे.
झोरे म्हणाले, मी पालकमंत्री उदय सामंत यांना सोडणार नाही. मी शिंदे गटाच्या शिवसेनेत असून मंत्री उदय सामंत याचे कट्टर समर्थक असल्याचे त्यांनी ठणकावले. वेतोशी ग्रामपंचायतीवर गाव पॅनलने बाजी मारली आहे. तर अरुण झोरे सरपंचपदी विराजमान झाले आहेत.