
अपदा उद्घाटन
rat२३११. txt
(पान २ साठी, संक्षिप्त)
फोटो ओळी
-rat२३p२.jpg ः
७०४४१
रत्नागिरी ः आपदा मित्र प्रशिक्षण उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,
------
आपदा मित्र प्रशिक्षण उद्घाटन सोहळा
रत्नागिरी ः राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपदा मित्र प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, उपनियंत्रक नागरी संरक्षणदलाचे विजय जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरक्षा शाखा अविनाश केदारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते. आपदा मित्र हे प्रशासनाचे दूत म्हणून महत्त्वाची भूमिका निभावतील, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
---------
फोटो ओळी
-rat२३p३.jpg ः
७०४४२
वेदिका वारांगे
-rat२३p४.jpg ः
७०४४३
आर्यन गुरव
-rat२३p५.jpg ः
७०४४४
आशिष गोबरे
लांजातील तीन विद्यार्थ्यांची नासा भेटीसाठी निवड
लांजा ः तालुक्यातील शिरवली, वनगुळे आणि लांजा नं. ५ च्या तीन विद्यार्थ्यांची नासा व इस्रोसाठी निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने यंदा प्रथमच नासा व इस्रोभेटीसाठी निवड चाचणी परीक्षा आयोजित केली होती. अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या नासा इस्रो या संस्थेच्या भेटीसाठी ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून संशोधक शास्त्रज्ञ निर्माण होण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. अंतिम जिल्हास्तरीय मुलाखत व प्रात्यक्षिक-सादरीकरण परीक्षेत शिरवली शाळेच्या आशिष गोबरे याने बाजी मारली व तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. नासा व इस्रोभेटीची सुवर्णसंधी त्याला प्राप्त झाली तर वनगुळे नं. १ चा आर्यन गुरव आणि लांजा नं. ५ ची वेदिका वारंगे या विद्यार्थ्यांची इस्रोसाठी निवड झाली आहे.
बल्लाळ गणेश देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव
लांजा ः तालुक्याच्या पूर्व भागात सह्याद्रीच्या कडेकपारीत प्रभानवल्ली गणेशखोरी भागात वसलेल्या आणि क वर्गीय पर्यटनस्थळ असलेल्या श्री बल्लाळ गणेश देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सवाचा मुख्य दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. हे देवस्थान स्वयंभू असून सांगली येथील प. पू. देसाई महाराज यांना झालेल्या दृष्टांतानुसार श्री बल्लाळ गणेश देवस्थान उदयास आले आहे. श्रींचे ३३वे प्रकट वर्ष आहे. लांजा तालुक्याच्या कडेकपारीत वसलेले क वर्गीय पर्यटन स्थान म्हणून हे स्थान उदयास आले आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस होता. या दिवशी सकाळी ८ वा. होमहवन, धार्मिक विधी तसेच सकाळी दहा ते अकरा वा. भजन, दुपारी १२ ते ३.३० महाप्रसाद झाला. सायंकाळी साडेपाच वाजता हरिपाठ कार्यक्रम झाला.
फोटो ओळी
-rat२३p८.jpg ः
७०४४७
राजापूर ः नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्याकडे निवेदन देताना मुस्लिम समाजबांधव.
---
राजापुरातील मुस्लिम बांधवांचे तहसीलदारांना निवेदन
राजापूर ः अल्पसंख्यांक हक्क दिनाचे औचित्य साधून राजापूर तालुका मुस्लिम समाजाच्यावतीने विविध सामाजिक समस्या आणि मागण्यांबाबत शासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन नुकतेच तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी शौकत नाखवा, सुलतान ठाकूर, हनिफ काझी, अशरफ काझी, आशफाक हाजू, मजीद पन्हळेकर, शफीक वाघू, जुनेद ठाकूर, एजाज बांगी आदी उपस्थित होते.
मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनामध्ये जिल्हास्तरावर अल्पसंख्यांक सनियंत्रण समिती जिल्ह्यातील अल्पसंख्यांकामधून कार्यान्वित करावी, मौलाना आझाद शैक्षणिक निधी प्रतीवर्ष १० कोटींची तरतूद करावी, जिल्हा नियोजन समितीवर पाच सदस्यांची निवड करावी, पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, मुस्लिमांवर होणारे हल्ले आणि जातीयवादी अपप्रचार या विरोधात उचित कायदे करावेत, अल्पसंख्यांकांसाठी राज्य अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूद वाढवून ती किमान शंभर कोटी करावी, जिल्हास्तरावर एक पूर्णवेळ अधिकारी व समुपदेशन केंद्राची निर्मिती करावी, आदी विविध मागण्यांचा समावेश आहे.