मार्गशीर्ष महिन्यात चिकनच्या मागणीत 30 टक्क्यांनी घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्गशीर्ष महिन्यात चिकनच्या मागणीत 30 टक्क्यांनी घट
मार्गशीर्ष महिन्यात चिकनच्या मागणीत 30 टक्क्यांनी घट

मार्गशीर्ष महिन्यात चिकनच्या मागणीत 30 टक्क्यांनी घट

sakal_logo
By

rat२३२८.txt

(पान २ साठी)

चिकनच्या मागणीत ३० टक्क्यांनी घट

रत्नागिरी, ता. २३ : मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार न करणाऱ्‍या नागरिकांची संख्या वाढल्याने चिकनच्या मागणीत ३० टक्के एवढी घट झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यात अपेक्षित थंडी न पडल्याचा परिणाम म्हणून चिकनच्या मागणीत पंचवीस टक्क्यांनी घट झाली आहे. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मागणी वाढून दरातही तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास आणि संपूर्ण महिन्यात मांसाहार न करणाऱ्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चिकन आणि अंड्याच्या मागणीत घट झाली आहे. चिकनची मागणी पंचवीस टक्क्यांनी घटली आहे, तर अंड्याच्या मागणीत चढ-उतार सुरू आहे. २३ डिसेंबरनंतर म्हणजे मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर चिकनच्या मागणीत अचानक वाढ होईल, परिणामी दरातही काहीशी तेजी येण्याची शक्यता आहे. दरवर्षी हिवाळ्यात अंडी आणि चिकनची मागणी वाढते. यंदा हिवाळ्यात अपेक्षित थंडी अद्याप पडलेली नाही. थंडी वाढल्यास चिकन, अंड्याच्या मागणीत वाढ होईल. अद्याप थंडी पडलेली नाही. चिकनची मागणी कमी झाल्यामुळे कुक्कुटपालक सावधगिरीने पावले उचलत आहेत. त्यात मक्याचे दर बावीस रुपयांवर गेल्यामुळे खाद्याचे दरही चढचे आहेत.