गुरूवारी अलोरेत ‘ग्रामीण उद्योजक’ राजन दळी यांची उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरूवारी अलोरेत ‘ग्रामीण उद्योजक’ राजन दळी यांची उपस्थिती
गुरूवारी अलोरेत ‘ग्रामीण उद्योजक’ राजन दळी यांची उपस्थिती

गुरूवारी अलोरेत ‘ग्रामीण उद्योजक’ राजन दळी यांची उपस्थिती

sakal_logo
By

-rat२३p१७.jpg ः
७०५०७
राजन दळी
-----------
राजन दळींचा उद्योजकीय प्रवास उलगडणार
आगवेकर विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव ; विद्यार्थी संवाद साधणार
चिपळूण, ता. २३ः आपल्या रौप्यमहोत्सवी कारकिर्दीत राज्यातील १९ वी आदर्श शाळा असा नावलौकिक संपादन केलेली तालुक्यातील अलोरे येथील (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) शाळेच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २९) सकाळी १० ते १ या वेळेत ‘ग्रामीण उद्योजक’ राजन दळी यांची उपस्थिती लाभणार आहे.
राजन दळी हे ‘कृपा हेअरटॉनिक’च्या माध्यमातून, ‘उद्योग आणि उद्योजक’ फक्त शहरातच बहरतात, या समजुतीला छेद देणारे व किराणा मालाच्या दुकानापासून ते लोकप्रिय आयुर्वेदिक औषधी तेलनिर्मितीचा प्रवास करणारे धोपावे (गुहागर) येथील उद्योजक आहेत. शाळा संकुलात अनंत लक्ष्मण आग्रे स्मृतीविचार मंचावर ११/१२वी विज्ञान विद्यार्थ्यांशी राजन दळी संवाद साधतील तर ९ वी, १०वी विज्ञान विद्यार्थ्यांशी मंजुषा देशपांडे-कुलकर्णी आणि प्रसाद कारखानीस संवाद साधतील. स्वागतयात्रा अंतर्गत जलदिंडी (श्रावणबाळ) निघणार आहे. जलदिंडी ही शाळेच्या सध्याच्या इमारतीतून सवाद्य मिरवणुकीने शासकीय मैदानाकडे रवाना होईल. मैदानावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत ५० घंटा टोल वाजवून ‘बालगोकुलम’चा प्रारंभ होईल. बालगोकुलमअंतर्गत लगोरी, पाच खड्यांचे खेळ, हुतूतू, काचकवड्या, आबाधुबी, गोट्या, लंगडी, सोनसाखळी, विटीदांडू आदी पारंपरिक मातीतील खेळ खेळले जातील. ‘फिटनेस ट्रेनर’ तुषार पवार हे विशेष मार्गदर्शन करतील. शिशुविहार व प्राथमिक आणि ११/१२वी कला या गटातील काही विद्यार्थी स्मृतिस्थळाजवळ (जुनी शाळा शिंदे कॅन्टिन) वृक्षारोपण करणार आहेत.
सुवर्ण महोत्सवांतर्गत १९७२ ते ९२ या कालावधीत शाळा ज्या विविध इमारतींमध्ये भरत होती त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला जाणार आहे. या तिसऱ्या दिवशी सायंकाळी सायं. ४ ते ७ वा. करमणूक कार्यक्रमअंतर्गत शाळेतील ८वी ते १०वी, ११वी व १२वी विज्ञानवर्गाचे विविध गुणदर्शन असेल. सायं. ६ वा. ‘शिवचरित्र’ या विषयावर विनय लाड यांचे व्याख्यान होणार आहे अशी माहिती शाळा समिती चेअरमन विठ्ठल चितळे यांनी दिली.