जिल्हा वकृत्व स्पर्धेत सिद्धी सावंत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा वकृत्व स्पर्धेत 
सिद्धी सावंत प्रथम
जिल्हा वकृत्व स्पर्धेत सिद्धी सावंत प्रथम

जिल्हा वकृत्व स्पर्धेत सिद्धी सावंत प्रथम

sakal_logo
By

70568
सावंतवाडी : विजेत्या विद्यार्थांसमवेत मान्यवर.

जिल्हा वकृत्व स्पर्धेत
सिद्धी सावंत प्रथम
सावंतवाडी ः अनुभव शिक्षा केंद्र साद टीम कणकवली आणि श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने येथे झालेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत सिद्धी सावंत प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. तर द्वितीय क्रमांक ऐश्वर्या राणे, तृतीय पल्लवी कासार यांनी पटकावला. ग्रंथपाल महेंद्र पटेल, परीक्षक माया रहाटे, पूनम नाईक, सहदेव पाटकर, जयराम जाधव, केशव नाचिवणेकर, पिझा मकादार, गौरी गोसावी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रस्तावना जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांनी केली. यामध्ये त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा आणि अनुभव शिक्षा केंद्राची थोडक्यात माहिती सांगितली. वीस जण स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रेरणा चिंदरकर, अंजली सावंत यांना बक्षीस देण्यात आले. अॅड. एस. व्ही. कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांचे सहकार्य लाभले.
.................
‘शुभमंगल’बाबत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. या योजनेंतर्गत सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय संवर्गातील वधूच्या आईला रुपये १० हजार रुपयांच्या अनुदान देण्यात येते. सुधारीत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेंतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात, त्यांना सुध्दा रुपये १० हजार इतके अनुदान देण्यात येते.