भोस्ते घाटात गतीरोधक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोस्ते घाटात गतीरोधक
भोस्ते घाटात गतीरोधक

भोस्ते घाटात गतीरोधक

sakal_logo
By

rat२३२५.txt

( पान ५ साठी, संक्षिप्त)

भोस्ते घाटात आणखी दोन गतिरोधक

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाने आता आणखी दोन गतिरोधक टाकले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांची संख्या आता १२ झाली आहे. अपघातग्रस्त वाहने ज्या भिंतीवर आदळतात त्या संरक्षक भिंतीवर आता जुने टायर लटकवण्यात आले आहेत. घाट उतरणाऱ्‍या एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास ते वाहन संरक्षक भिंतीवर आदळून भिंत तुटू नये यासाठी बांधकाम विभागाने ही खबरदारी घेतली आहे.
भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर आजपर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. या अपघातात काहींचा बळी तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत. या वळणावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे; मात्र बांधकाम विभाग थातुरमातूर उपाययोजना करून वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहनचालकांमधून केला जात आहे. महामार्गाचे काम पूर्ण होऊन जेव्हा हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला तेव्हापासून या वळणावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दर दोन दिवसाआड घाट उतरणारी अवजड वाहने या वळणावर अपघातग्रस्त होत आहेत.
--

२२ ग्रामपंचायतीत आमदार कदम यांना यश

दापोली ः दापोलीत झालेल्या ३० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी २२ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांचा करिष्मा दिसून आला. या ग्रामपंचायतींच्या सरपंचासह सदस्यही बाळासाहेबांच्या शिवसेनेमधून निवडून आल्याचा दावा तालुकाप्रमुख उन्मेश राजे यांनी केला आहे. ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या ९ पैकी ६ ग्रामपंचायती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या पक्षाच्या निवडून आल्या होत्या व निवडणूक निकालात २१ पैकी १६ ग्रामपंचायती राखण्यात आमदार योगेश कदम यांना यश आले आहे.