प्रलंबित मागण्यांमुळे कोतवाल संघटना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित मागण्यांमुळे कोतवाल संघटना आक्रमक
प्रलंबित मागण्यांमुळे कोतवाल संघटना आक्रमक

प्रलंबित मागण्यांमुळे कोतवाल संघटना आक्रमक

sakal_logo
By

rat२३३०.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२३p२४.jpg ः
७०५६१
राजापूर ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हा कोतवाल संघटनेचे पदाधिकारी.
--

प्रलंबित मागण्यांमुळे कोतवाल संघटना आक्रमक

बुधवारी विधानभवनावर धडकणार ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राजापूर, ता. २३ ः राज्याच्या महसूल प्रशासनात मानधनावर शासनास सेवा देणाऱ्‍या कोतवाल संवर्गाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित राहिलेल्या आहेत. या मागण्यांच्या मंजुरीसाठी वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रलंबित मागण्यांना शासनाने तातडीने मंजुरी देऊन न्याय द्यावा अन्यथा बुधवारी (ता. २८) विधानभवनावर धडक देण्यात येईल, असा इशारा कोतवाल संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा कोतवाल संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्‍यांना देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटनेचे पदाधिकारी शेखर सावंत, विक्रांत कदम, शशिकांत सनगरे, सुशिल दुर्गवली, सूरज कांबळे आदींनी हे निवेदन दिले. त्यामध्ये कोतवाल संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात येणाऱ्या धडक मोर्चामध्ये रत्नागिरी जिल्हा कोतवाल संघटना सहभागी होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कोतवाल संघटनेचे पदाधिकारी कोतवाल संघटनेकरिता चतुर्थश्रेणी विचारधीन ठेवून सद्यःस्थितीमध्ये किमान वेतनप्रक्रिया शासनस्तरावर पूर्ण होईपर्यंत तूर्तास कोतवाल संवर्गाच्या मानधनात सरसकट वाढ करून १५ हजार द्यावेत. तलाठी व तत्सम पदांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी धर्तीवर आरक्षण लागू करावे, कोरोना मयत, मयत कोतवाल यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घ्यावे, कोतवालांना निर्वाह भत्ता देऊन सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावी आदी विविध कोतवाल संघटनेच्या मागण्या गेल्या काही वर्षापासून शासनदरबारी प्रलंबित राहिलेल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक विचारविनिमय होऊन त्याला तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.