दिनदर्शिकेचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिनदर्शिकेचे लोकार्पण
दिनदर्शिकेचे लोकार्पण

दिनदर्शिकेचे लोकार्पण

sakal_logo
By

rat२३२२.txt

(पान ५ साठी, संक्षिप्त)

शिवस्वराज प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण

गुहागर ः शिवस्वराज प्रतिष्ठान ५, वर्धापनदिन व दिनदर्शिका २०२३ लोकार्पण सोहळा नालासोपारा येथील नूतन विद्यालयात झाला. या वेळी मिलिंद पाटील, दिनेश शिंदे, तुकाराम पास्टे आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्यावतीने आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा देण्यात आला. शिवस्वराज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने २०२२ मिलिंद पाटील यांना गौरवण्यात आले. शिवस्वराज्य कलागौरव पुरस्कार २०२२ कृष्णा येद्रे यांना पुरस्कार देण्यात आला. विशेष सहकार्य पुरस्कार क्रिकेट स्पर्धा -२०२२ सचिन कुळये, संदेश आंबेकर, वैभव नाचरे, सचिन तेरेकर आणि भावेश बाईत यांना देण्यात आला. लेखक/कवी पुरस्कार नीलेश उजाळ यांना देण्यात आला. घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रतीक गावडे, गणेश टेमकर, संकेत येद्रे यांना अनुक्रमे गौरविण्यात आले.


फोटो ओळी
-rat२३p२०.jpg ः
७०५१६
गुहागर ः स्पर्धेत तयार करण्यात आलेले मोदक.

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात पाककृती स्पर्धा

गुहागर ः पाककला हे क्षेत्र केवळ स्त्रियांसाठीच मर्यादित नाही तर यामध्ये पुरुषही करिअर करू शकतात. शिवाय या क्षेत्रात मुलींनीही भविष्यात संधी ओळखून भरारी घ्यावी, असे आवाहन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. मनाली बावधनकर यांनी केले. या महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे आविष्कार युवामहोत्सव २०२२ या अंतर्गत पाककृती व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. दोन्हीही स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत कोकणचे पारंपरिक पदार्थ उकडीचे मोदक, अळूवडी, नाचणीची भाकरी व पालेभाजी आणि इतर पदार्थात कोथिंबीर वडी, पुरणपोळी, तांदळाची खीर, शेंगदाणा लाडू, तिळाचे लाडू आदी पदार्थाचे सादरीकरण झाले. स्पर्धेत प्रथम क्रमांक मनस्वी पटेकर (उकडीचे मोदक), द्वितीय क्रमांक विभागून स्नेहा गमरे (शेंगदाणा लाडू), श्रद्धा चाळके (टॅकोस), तृतीय क्रमांक विभागून उर्वशी झिंबर (अळूवडी व सोलकढी), अक्षता गुरव (नाचणीची भाकरी व पालेभाजी), उत्तेजनार्थ सूरज कुळे (उकडीचे मोदक) यांना मिळाले. रांगोळी स्पर्धेत स्त्रीभ्रूणहत्या, पाणी वाचवा-जीवन वाचवा, लेक वाचवा-लेक शिकवा, महागाई, व्यसनमुक्ती इ. विषयावर रांगोळ्या रेखाटल्या. या स्पर्धेत मोनिका बेंदरकर, प्राची दवंडे, सूरज कुळे, उत्तेजनार्थ साक्षी मोरे व पूर्वा सुर्वे यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले.