करवंटीपासून बनलेल्या वस्तूंबाबत मालवणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवंटीपासून बनलेल्या वस्तूंबाबत 
मालवणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करवंटीपासून बनलेल्या वस्तूंबाबत मालवणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

करवंटीपासून बनलेल्या वस्तूंबाबत मालवणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

70582
मालवणः देवगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी करवंटीपासून बनणाऱ्या वस्तूंची माहिती घेतली.

करवंटीपासून बनलेल्या वस्तूंबाबत
मालवणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मालवण : देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ‘इंडस्ट्रीयल व्हिजिट’ सहली दरम्यान शहरातील मेढा येथील भूषण मेतर यांच्या घरी भेट देऊन त्यांनी नारळाच्या करवंटीपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती घेतली. मेतर हे नारळाच्या करवंटीपासून विविध आकर्षक व नावीन्यपूर्ण वस्तू बनवितात. यामध्ये शोभिवंत तसेच वापरायोग्य वस्तूंचाही समावेश आहे. देवगड येथील केळकर महाविद्यालयाच्या बँकिंग इन्शुरन्स शाखेच्या ४० विद्यार्थ्यांनी आपल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट सहलीदरम्यान श्रीधर काळे यांच्या माध्यमातून मेतर यांच्या घरी भेट देऊन करवंटीच्या वस्तूंबाबत व्यवसायिक दृष्टिकोनातून माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाच्या प्रा. रश्मी हिर्लेकर, प्रा. शामली तारी उपस्थित होत्या. मेतर यांनी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या धर्तीवर बनविण्यात येणाऱ्या करवंटी वस्तूंबाबत माहिती दिली. करवंटीपासून आकर्षक वस्तू कशा बनवितात, त्यात आवश्यक असणारी कल्पकता तसेच त्यातील व्यावसायिक संधी याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
----
70568
सावंतवाडी : विजेत्या विद्यार्थांसमवेत मान्यवर.

वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी सावंत प्रथम
सावंतवाडी ः अनुभव शिक्षा केंद्र साद टीम कणकवली आणि श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने येथे झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी सावंत प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. तर द्वितीय क्रमांक ऐश्वर्या राणे, तृतीय पल्लवी कासार यांनी पटकावला. ग्रंथपाल महेंद्र पटेल, परीक्षक माया रहाटे, पूनम नाईक, सहदेव पाटकर, जयराम जाधव, केशव नाचिवणेकर, पिझा मकादार, गौरी गोसावी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रस्तावना जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांनी केली. यामध्ये त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा आणि अनुभव शिक्षा केंद्राची थोडक्यात माहिती सांगितली. वीस जण स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रेरणा चिंदरकर, अंजली सावंत यांना बक्षीस देण्यात आले. अॅड. एस. व्ही. कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांचे सहकार्य लाभले.
.................
70467
कट्टा : बडबडगीत, गोष्ट सांगणे स्पर्धेत सहभागी मुले व पालक.

गोष्टी, बडबड गीतांनी रंगत
ओरोस ः मालवण पंचायत समितीचे माजी सभापती स्वातंत्र्य सैनिक बापूभाई शिरोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे अंगणवाडीतील मुलांच्या बडबडगीत व गोष्ट सांगणे या स्पर्धा झाल्या. प्रारंभी बालकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दीपक भोगटे यांनी बापूभाईंच्या निःस्वार्थी व सेवाभावी वृत्तीचा पालकांना परिचय करून दिला. तसेच बापूभाईंना लहान मुले आवडत असल्याने हा अंगणवाडीच्या मुलांचा मेळावा आयोजित केला आहे, असे सांगितले. कट्टा, कुसरवे, गोळवण, वाईरकरवाडी, नांदोस, काराणेवाडी, गुरामवाडी, डॉन बॉस्को इत्यादी अंगणवाडीतील ४५ मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या समारंभास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, काळसेकर सर, सुजाता पावसकर, प्रा. गिरकर, प्रा.नाईक, प्रा.जाधव आदी उपस्थित होते.
---
‘शुभमंगल’ योजनेबाबत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. या योजनेंतर्गत सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय संवर्गातील वधूच्या आईला रुपये १० हजार रुपयांच्या अनुदान देण्यात येते. सुधारीत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेंतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात, त्यांना सुध्दा रुपये १० हजार इतके अनुदान देण्यात येते.