महामार्ग सुस्थितीसाठी १२ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग सुस्थितीसाठी १२ कोटी
महामार्ग सुस्थितीसाठी १२ कोटी

महामार्ग सुस्थितीसाठी १२ कोटी

sakal_logo
By

महामार्ग सुस्थितीसाठी १२ कोटी
यशवंत घोटकर; हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई

पॉईंटर
* तब्बल अकरा वर्षे काम रखडल्याने संताप
* तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
* कासू ते इंदापूर चौपदरीकरण जानेवारीत सुरू
* देखरेख एजन्सींवरही होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी आज येथे दिले.
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी रायगडपासून आंदोलनाचा इशारा देताच राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली आहे. या विभागाने संयुक्त बैठक घेऊन चौपदरीकरणाचे काम जानेवारीत नव्याने सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. महामार्गाचे काम सुमारे ११ वर्षे रखडले आहे. सध्या महामार्गाची दुरवस्था आहे. पनवेल ते संगमेश्वरदरम्यान या टप्प्यात भलेमोठे खड्डे पडले आहेत. पेण ते कोलाड, तिसे रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्यावरील साधे खड्डे भरून हा मार्ग सुस्थितीत करण्यास एनएचएआयला सपशेल अपयश आल्याने वाकणनाका येथे अभिनव मार्गाने भजन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या संदर्भात एनएचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी त्यांच्या पनवेल कार्यालयात काल संयुक्त बैठक बोलावली होती. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्ते सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याचे तसेच खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदार व देखरेख एजन्सींवर कारवाई करण्यात येईल, असे घोटकर यांनी सांगितले.