राणेंच्याच विचारांचा गोठणे गावाला सरपंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणेंच्याच विचारांचा
गोठणे गावाला सरपंच
राणेंच्याच विचारांचा गोठणे गावाला सरपंच

राणेंच्याच विचारांचा गोठणे गावाला सरपंच

sakal_logo
By

70610
मालवण ः गोठणे ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या भाजपच्या सरपंचांसह सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

राणेंच्याच विचारांचा
गोठणे गावाला सरपंच

दीप्ती हाटलेंची निवड; ३५ वर्षांची परंपरा कायम

मालवण, ता. २३ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विचारांचा सरपंच विराजमान होण्याची ३५ वर्षांची परंपरा गोठणे ग्रामपंचायतीने यावेळीही राखली. भाजपच्या दीप्ती हाटले सरपंचपदी विराजमान झाल्या असून भाजपचे सातपैकी पाच सदस्य निवडून आले आहेत.
गोठणे ग्रामपंचायतीमध्ये गेली ३५ वर्षे राणे समर्थक व सध्या भाजपचा सरपंच सातत्याने निवडून येत आहे. यासाठी उद्योजक देवदत्त सामंत, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर तसेच गोठणे गावचे सुपुत्र उद्योजक गणेश सुर्वे, महादेव साटम, सुरेश साटम, शीला धुरी, भास्कर वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत एकहाती सत्ता कायम ठेवली आहे. या कालावधीत विरोधकांना एकदाही सत्ता दिलेली नाही. यासाठी माजी उपसरपंच राजू लाड, संतोष धुरी, योगेश बाईत, रवींद्र सांडव, तुषार हाटले, महेश परब, घनःश्याम चव्हाण, बाबू परब, महेश चिंदरकर, समीर पालांडे, हनुमंत लाड, राजेश जगताप, शैलेश लाड, अभी साटम, दया हाटले, तुषार लाड, रवींद्र सांडव, परेश बाईत, विजय घाडी, पांडुरंग लाड, राजू जगताप या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेत गोठणे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकावला. या निवडणुकीत बाबू परब, प्रथमेश घाडीगावकर, रतन साटम, अर्चना मुणगेकर, सोनाली पालांडे हे पाच भाजपचे सदस्य विजयी झाले.