
कोल्हापुरच्या तरुणाचे कलमठमध्ये डोके फोडले
कोल्हापुरच्या तरुणाचे
कलमठमध्ये डोके फोडले
संशयित पसार; घटना सीसीटीव्हीत कैद
कणकवली, ता.२३ : शहरालगतच्या कलमठ कुंभारवाडी येथे एकाच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यात अमोल रामचंद्र दवडते (वय ३२, रा. कोल्हापूर) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कलमठ मुस्लिमवाडी येथील इरफान दाऊद शेख (वय ४०) याने अमोलच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने वार केला. या हल्ल्यात अमोल रक्तबंबाळ झाला. घटनास्थळावरून संशयित इरफान पसार झाला. जखमी दवडते याने पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून कणकवली पोलिस संशयिताच्या मागावर आहेत. कणकवली पोलिसांकडून याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.