नांदगावातील वृद्धेचा विहिरीत मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगावातील वृद्धेचा विहिरीत मृतदेह
नांदगावातील वृद्धेचा विहिरीत मृतदेह

नांदगावातील वृद्धेचा विहिरीत मृतदेह

sakal_logo
By

नांदगावातील वृद्धेचा विहिरीत मृतदेह
कणकवली : नांदगाव-गोसावीवाडी (ता.कणकवली) येथील सुमित्रा अंकुश गोसावी (वय ६५) या वृद्धेचा मृतदेह आज शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास नांदगाव-गोसावीवाडी येथील भाटीच्या शेतजमीनीतील विहिरीत आढळला. ती गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरातून शेतात गेली होती; मात्र तिचा मृतदेह विहिरीत कसा आढळला याचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची खबर अजय शांताराम गोसावी यांनी दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.