बचतगटांच्या उन्नतीसाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगटांच्या उन्नतीसाठी प्रयत्न
बचतगटांच्या उन्नतीसाठी प्रयत्न

बचतगटांच्या उन्नतीसाठी प्रयत्न

sakal_logo
By

70667
कुडाळ ः ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ उपक्रमाचे उद्‍घाटन करताना सीईओ प्रदीप नायर. शेजारी संजय कापडणीस, राजेंद्र पराडकर, विशाल तनपुरे, विजय चव्हाण आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

बचतगटांच्या उन्नतीसाठी प्रयत्न

सीईओ प्रजित नायर ः कुडाळात ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’चे उद्‍घाटन

कुडाळ, ता. २४ ः केंद्राचा महत्वाकांक्षी उपक्रम ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेला माल सहज विक्री करता येणार आहे. कुडाळसह लवकरच कणकवली रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले. येथील रेल्वे स्थानक येथे ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पहिल्या स्टॉलच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला बचतगट कार्यरत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने केंद्राच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व कणकवली या दोन स्टेशनची निवड करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यात ३७ स्वयंसहायता समूह गटांची निवड केली आहे. कुडाळ पंचायत समिती व उमेद यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्टॉलवर कोकणी मेवा खाद्यपदार्थ लाकडी खेळणी आदी विविध वस्तू असणार आहेत. सर्व महिलांना समान न्याय मिळण्यासाठी रोटेशन पद्धतीने स्टॉल ठरवून देण्यात आले आहे. एका स्वयंसहायता समूह गटाला पंधरा दिवसांसाठी स्टॉल देण्यात आला आहे. त्यानंतर १६ व्या दिवशी स्टॉल दुसऱ्या समुहाला देण्यात येणार आहे.
कुडाळ रेल्वेस्थानक येथे या उपक्रमाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा ‘उमेद’ व्यवस्थापक वैभव पवार, गणेश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, मधुरा धुरी आदी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील बचतगटांनी उत्पादित केलेल्या नावीन्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीसाठी येथील रेल्वेस्थानकावर स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलवर कोकणी मेवा, खाद्यपदार्थ, लाकडी खेळणी आदी विविध वस्तू असणार आहेत. सर्व महिलांना समान न्याय मिळण्यासाठी रोटेशन पद्धतीने स्टॉल ठरवून दिले आहेत. यावेळी तालुका व्यवस्थापक माहिती मूल्यमापन सनियंत्रक गौरी आईर, सेंद्रिय शेती समन्वयक सुशांत कदम, प्रभाग समन्वयक मनीषा कांबळी, सुप्रिया वालावलकर, प्राजक्ता नाईक, कृषी व्यवस्थापक रसिका राणे आदी उपस्थित होत्या.