नांदगाव सरपंच, सदस्यांचा मोरजकर ट्रस्टतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगाव सरपंच, सदस्यांचा 
मोरजकर ट्रस्टतर्फे सत्कार
नांदगाव सरपंच, सदस्यांचा मोरजकर ट्रस्टतर्फे सत्कार

नांदगाव सरपंच, सदस्यांचा मोरजकर ट्रस्टतर्फे सत्कार

sakal_logo
By

70672
नांदगाव ः नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार करताना ट्रस्टचे पदाधिकारी.

नांदगाव सरपंच, सदस्यांचा
मोरजकर ट्रस्टतर्फे सत्कार
नांदगाव ः किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नांदगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गौरव सोहळा नुकताच झाला. ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच रविराज मोरजकर व सदस्यांचा सत्कार सर्वप्रथम करण्याचा मान ट्रस्टने मिळविला. नवनिर्वाचित सरपंच रविराज मोरजकर यांना सन्मानित करण्यात आले. या विजयात मोलाची कामगिरी बजावलेल्या असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांच्यासह माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, तसेच विठोबा कांदळकर, विनोद मोरये, पूजा सावंत, अक्षता खोत, अनिकेत तांबे, गौरी परब, इरफान साटविलकर, रमिजान गफार बटवाले, संतोष बिडये, नमिता मोरये, जैबा नावलेकर या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार झाला. राजेंद्र मोरजकर, मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, रज्जाक बटवाले, संतोष मिराशी, असलदे उपसरपंच संतोष परब, तुकाराम तुप्पट, कमलाकर पाटील, संजय मोरजकर, सुभाष बिडये, हनुमंत वाळके, मारुती मोरये आदी उपस्थित होते. हनुमंत वाळके यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष मोरजकर यांनी आभार मानले.