वेंगुर्लेत नाताळनिमित्त शांतता फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत नाताळनिमित्त शांतता फेरी
वेंगुर्लेत नाताळनिमित्त शांतता फेरी

वेंगुर्लेत नाताळनिमित्त शांतता फेरी

sakal_logo
By

70689
वेंगुर्ले ः येथे नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांतर्फे शांतता फेरी काढण्यात आली.

वेंगुर्लेत नाताळनिमित्त शांतता फेरी

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ ः नाताळचे औचित्य साधून ख्रिस्ती बांधवांकडून प्रभू येशूंच्या जन्मोत्सवानिमित्त येथे शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रभू येशूंच्या प्रेमाचा आणि शांततेचा संदेश देण्यात आला.
या माध्यमातून परस्परातील राग, मत्सर विसरला जावा आणि सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे व यातूनच परिसरामध्ये सर्वत्र शांतता नांदावी, हा येशूंचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने फेरीचे आयोजन केले जाते. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ख्रिस्ती बांधवांच्या शांतता फेरीत सहभागी होत नाताळच्या शुभेच्छा दिल्या. वेंगुर्ले भाजपचे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, भाजप अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सायमन आल्मेडा यांच्या माध्यमातून परबवाडा-मासुरेवाडी येथे शांतता फेरीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, परबवाडा सरपंच पप्पू परब, उपसरपंच हेमंत गावडे, माजी सरपंच ईनासीन फर्नांडिस उपस्थित होते. या फेरीमध्ये शिरील आल्मेडा, निकलस फर्नांडिस, विल्सन फर्नाडिस, दुवाट फर्नांडिस, वॉल्टर डिसोझा, पारपीट डिसोझा, आना डिसोझा, ग्लॅसीस फर्नांडिस, सिल्व्हिया आल्मेडा आदी ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.