असलदेत मिनी अंगणवाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असलदेत मिनी अंगणवाडी
असलदेत मिनी अंगणवाडी

असलदेत मिनी अंगणवाडी

sakal_logo
By

70694
असलदे ः मिनी अंगणवाडी इमारतीचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

असलदेत मिनी अंगणवाडी
नांदगाव ः असलदे-तावडेवाडी येथे मिनी अंगणवाडी इमारतीचे आज उद्‍घाटन झाले. जुनी इमारत महामार्ग भूसंपादनात बाधित झाल्याने नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नव्याने प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी आमदार नीतेश राणे, गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी प्रयत्न केले. यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत डामरे, असलदे-तावडेवाडी शाळा चेअरमन शामसुंदर लोके, सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश परब, ग्रामपंचायत सदस्य दिनेश तावडे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलिस पाटील सावित्री पाताडे, ग्रामसेवक आर. डी. सावंत, सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, उदय परब, रघुनाथ लोके, संतोष घाडी, महेश लोके, सतीश पांचाळ, तावडे, दळवी, शाळेचे मुख्याध्यापक शांताराम जंगले, शिक्षक राजन नार्वेकर, अंगणवाडी सेविका पंचश्री नार्वेकर आदी उपस्थित होते.