
परशुराम ग्रामपंचायतबाबत भाजपचा दावा खोडसाळपणाचा
rat२४१३.txt
( पान ५ साठी मेन)
फोटो ओळी
- ratchl२४१.jpg ः
७०६६०
चिपळूण ः परशुराम ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या श्री देव धावजी गावविकास पॅनेलच्या सरपंच गायत्री जोगले यांच्यासह विजयी उमेदवार.
---
परशुराम ग्रामपंचायतीचा भाजपचा दावा खोडसाळ
सरपंचासह शिवसैनिकांचे स्पष्टीकरण ; दिशाभूल नको
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २४ ः गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शिवसेनेचे काम करत आहोत. सध्याही शिवसेना ठाकरे गटातच आहोत; मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत गावच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून आम्ही श्री देव धावजी गावविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवत आम्हाला विजयी केले ही वस्तुस्थिती आहे. परशुराम ग्रामपंचायतीवर भाजपने केलेल्या वर्चस्वाचा दावा पूर्णतः खोडसाळ आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे. आम्ही त्यांच्याशी कधीही संमत होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण नवनिर्वाचित सरपंच गायत्री जोगले यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला आहे.
तालुक्यातील परशुराम ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर थेट सरपंचपदी भाजपचा उमेदवार विराजमान झाल्याचा दावा तालुकाध्यक्ष वसंत मानकर यांनी केला मात्र खुद्द सरपंच आणि विजयी झालेल्या उमेदवारांनी खोडून काढला आहे. थेट सरपंचप म्हणून विजयी झालेल्या जोगले यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही परशुराम गावातील सर्व शिवसैनिकांनी गेली अनेक वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहून गावातील विकासकामे करून घेतली आहेत. काही महिन्यापूर्वीच शिवसेनेत फूट पडली; मात्र आम्ही सर्वांनी मूळ शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असूनसुद्धा गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री देव धावजी गावविकास पॅनल तयार केले. या पॅनलच्या माध्यमातून सर्वपक्षीय समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवली. आमच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी भरघोस मतांनी आम्हाला विजयी केले. वास्तविक भाजपाचा या निवडणुकीत कोणताही संबंध आलेला नाही. तरीही भाजपने परशुराम ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच विजयी झाल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा पूर्णतः खोडसाळ आणि ग्रामस्थांची दिशाभूल करणारा आहे. पक्षीय विषय विचारात घेतल्यास आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रामाणिक काम करत आहोत. केवळ आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी भाजपने असा खोडसाळ दावा करू नये. पुढील पाच वर्षे आम्ही श्री देवी धावजी गावविकास पॅनेलच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग येसरे, शाखाप्रमुख अंकुश किंजळे, गणेश जोगळे, मनोहर बडवे, लहू किंजळे, संदीप किंजळे, प्रणित गुरव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
--
कोट
गावचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने खांदाट बहुउद्देशीय विकासमंचाखाली आम्ही निवडणूक लढलो आणि त्याला यश आले. निवडणुकीत आमच्या पॅनलने पक्षीय राजकारण केले नव्हते. खांदाटपालीत भाजपाचा सदस्य विजयी झाल्याचा दावा लोकांची दिशाभूल करणारा आहे.
- प्रदीप नळकांडे, उपाध्यक्ष, खांदाट बहुद्देशीय विकास मंच