संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी
द्रोण हजारेची निवड
देवरूख ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागीय सबज्युनियर कॅरम स्पर्धेत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या द्रोण हजारे याचे राज्यस्तरीय सबज्युनियर कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. द्रोण हा सातवीमध्ये शिकत आहे. महाराष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे सचिव व माजी आमदार डॉ. सुभाष बने, महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक रोहन बने, बने इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रदीश कलिंगड, देवरूख कॅरम असोसिएशनचे दिलिप विंचू, सागर शेट्ये, बाबा दामुष्टे, दत्ता नार्वेकर आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कसबा हायस्कूलचे
''उमंग'' जल्लोषात साजरे
संगमेश्वर ः येथील संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या मराठी माध्यम विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उमंग-२०२२ व इंग्रजी माध्यमाचे तरंग-२०२२ १९ ते २० डिसेंबरला पार पडले. १९ डिसेंबरला सायं. ५.३० वा. संस्थेचे अध्यक्ष कॕप्टन अकबर खलपे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उमंग-२०२२ ला सायं. ठीक ६.३० वा. सुरवात झाली. कार्यक्रमात सर्वप्रथम दुआ सादर करण्यात आली. त्यानंतर विविध नृत्यप्रकारात दीपनृत्य, राष्ट्रीय एकात्मता, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, जाखडी, राजस्थानी, गरबा, झू झू डान्स, शैक्षणिक थीम, कव्वाली, वुमन थीम, नाटिका, लावणी, लेझी डान्स, रिंग डान्स, परी डान्स, गीतगायन, गोंधळ, कोळीनृत्य व फॕशन शो अशा विविधांगी नृत्यप्रकार व कलाप्रकार सादर करून आमच्या बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. दोन्ही माध्यमाच्या स्नेहसंमेलनासाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष नियाजसाहेब कापडी, इब्राहिम काझी, शौकत अली खलपे उपस्थित होते.

-ratchl२४३.jpg ःKOP२२L७०६८७ चिपळूण ः साने गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापक राजेंद्र वारे व सहकारी.
-------------
सावर्डेतील निकम विद्यालयात ग्राहक दिन
चिपळूण ः सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरूजी जयंती व राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला साने गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. साने गुरूजी यांच्या कार्याची ओळख करून देणारे व जागो ग्राहक जागो या संबंधी माहिती देणारे भित्तीपत्रक कविता हळदीवे, सिद्धी सावंत यांनी तयार केले होते. त्याचे उद्घाटन समीक्षा बागवे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ग्राहकांचे हक्क, अधिकार याचे विवेचन आमित साळवी यांनी केले. विद्यार्थी मनोगतात सिया सावंत या विद्यार्थिनीने साने गुरूजींच्या जीवनकार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर उपस्थित होते.