रत्नागिरी- दापोली बँकेच्या रत्नागिरी शाखेचा आज पंचवीसावा वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- दापोली बँकेच्या रत्नागिरी शाखेचा आज पंचवीसावा वर्धापनदिन
रत्नागिरी- दापोली बँकेच्या रत्नागिरी शाखेचा आज पंचवीसावा वर्धापनदिन

रत्नागिरी- दापोली बँकेच्या रत्नागिरी शाखेचा आज पंचवीसावा वर्धापनदिन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२४p९.jpg-KOP२२L७०७०३ रत्नागिरी ः दापोली अर्बन बँकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना अध्यक्ष जयवंत जालगावकर. सोबत नरेंद्र आयरे, सिद्धेश राक्षीकर, संदेश साठे.
--------------
दापोली अर्बनच्या रत्नागिरी शाखेचा आज वर्धापनदिन
रत्नागिरी, ता. २४ ः दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या येथील गाडीतळ शाखेचा रविवारी (ता. २५) २५वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. असंख्य ग्राहकांसाठी नव्याने विविध योजना राबवण्याचा मानस अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
मारूती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे आयोजित पत्रकार परिषदेत जालगावकर यांनी बँकेमार्फत भविष्यात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक नरेंद्र आयरे, शाखाधिकारी सिद्धेश राक्षीकर, संदेश साठे हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. बँकेने जिल्ह्यात प्रथमच २५ वर्षांपूर्वी शुभांगी कांबळे या महिलेला रिक्षा खरेदीसाठी कर्ज दिले होते. तलाठी, मंडल अधिकारी यांना लॅपटॉप खरेदीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात आला. गृहिणींना गॅस कनेक्शन, सिलेंडर खरेदीसाठी सन २००४ मध्ये फक्त ९ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात आला. महापुरात नुकसान झालेल्या व्यावसायिकांना बँकेमार्फत कमी व्याजदराने कर्जपुरवठा केला. जळितग्रस्तांना देखील बँकेने आर्थिक मदत केल्याचे जालगावकर यांनी सांगितले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत बँकेमार्फत २५ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सकाळी १०.३० वा. अल्पबचत सभागृहात ज्येष्ठ सभासदांच्या उपस्थितीत वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. उपस्थित सभासदांशी चर्चा करून त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व सूचनांचा बँक प्राधान्याने विचार करणार असल्याचे जालगावकर यांनी सांगितले. वर्धापन सोहळ्याला जास्तीत जास्त ग्राहक, ठेवीदार व रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जालगावकर यांनी केले आहे.