फोटोसंक्षिप्त-सुभानराव भोसलेंना सावंतवाडीत श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-सुभानराव भोसलेंना 
सावंतवाडीत श्रद्धांजली
फोटोसंक्षिप्त-सुभानराव भोसलेंना सावंतवाडीत श्रद्धांजली

फोटोसंक्षिप्त-सुभानराव भोसलेंना सावंतवाडीत श्रद्धांजली

sakal_logo
By

70704

सुभानराव भोसलेंना
सावंतवाडीत श्रद्धांजली
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य सुभानराव तथा किरण भोसले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुभानराव भोसले हे महाविद्यालयाच्या कमिटीचे सदस्य होते. त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये कर्मचाऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. राजघराण्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते नेहमी आपुलकीने येथील राजवाड्याला भेट देत असत. महाविद्यालयाच्या विकासासंदर्भात आवर्जून चौकशी करत असत. त्यांचा सहवास महत्त्वाचा होता. एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला आम्ही मुकलो, असे उद्‍गार प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी काढले. या प्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


70705

गौरवी खोत हिचे निबंध स्पर्धेत यश
सावंतवाडी ः उच्च माध्यमिक गटासाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच अणाव येथील आनंदाश्रमात मान्यवरांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेची उच्च माध्यमिक विभागाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी गौरवी खोत हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ही स्पर्धा पंचशील ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यक्त होता यावे, या उद्देशाने घेतली होती. गौरवीला मराठी अध्यापक प्रा. वैभव खानोलकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल गौरवी खोत आणि मार्गदर्शक शिक्षक प्रा. खानोलकर यांचे विद्यालयाच्या प्राचार्या कल्पना बोवलेकर यांच्यासह संस्थाध्यक्ष राऊळ आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.