संक्षिप्त-उपसरपंचपदाची 30 ला निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-उपसरपंचपदाची 
30 ला निवडणूक
संक्षिप्त-उपसरपंचपदाची 30 ला निवडणूक

संक्षिप्त-उपसरपंचपदाची 30 ला निवडणूक

sakal_logo
By

संक्षिप्त
उपसरपंचपदाची ३० ला निवडणूक
सावंतवाडी ः तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच व सदस्य निवडून आले आहेत: आता थेट सरपंचांची पहिली सभा व उपसरपंच निवड एकाच वेळी ३० डिसेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. ५२ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा सरपंचांचा कार्यकाल ३० डिसेंबरला संपत आहे. त्याच दिवशी थेट निवडून आलेले सरपंच पदभार स्वीकारणार आहेत. याच वेळी उपसरपंच निवड होणार आहे. उपसरपंच कुठल्या पक्षाचे बसतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपल्या निवडून आलेल्या सदस्यांना सावध करण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने उपसरपंच आपल्या पक्षाचा बसवण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करीत आहेत. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक ३० डिसेंबरला होणार असल्याचे निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी लता वाडकर व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी स्पष्ट केले.

कोईळला बुधवारी विविध कार्यक्रम
मालवण ः ‘एक गाव एक गणपती’ अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यातील कोईळ येथील श्री गणपती देवस्थान जीर्णोद्धार सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन २८ ला आयोजित केला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. २७ ला नेत्र, आरोग्य तपासणी शिबिर सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत होईल. २८ ला सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ ते १ महाआरती, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५.३० धार्मिक कार्यक्रम, ६ ते ७ आरती, ७ ते रात्री ८ दीपोत्सव, ९ ते १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ११ वाजता श्री सिद्धिविनायक नाट्यमंडळ, मुंबईचे दशावतारी नाटक (हार्मोनियम-मयूर गवळी) होणार आहे.

शतक महोत्सवाची १ जानेवारीला सांगता
मालवण ः येथील श्री शिवाजी वाचन मंदिरचे शतक महोत्सवी वर्ष १ जानेवारीला पूर्ण होत आहे. यानिमित्ताने वर्षभर दरमहा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ १ जानेवारीला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत येथील श्री दत्त मंदिर, भरड येथे साजरा होणार आहे. अध्यक्षस्थानी ओरोस येथील जिल्हा ग्रंथालयाचे सचिन हजारे प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां रेणूका दांडेकर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.