पोलिस भरतीसाठी 8 हजार उमेदवारी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरतीसाठी 8 हजार उमेदवारी अर्ज
पोलिस भरतीसाठी 8 हजार उमेदवारी अर्ज

पोलिस भरतीसाठी 8 हजार उमेदवारी अर्ज

sakal_logo
By

rat२४२.txt

(पान ५ साठी)

पोलिस भरतीसाठी ८ हजार अर्ज

जिल्ह्यात १३१ पदे ; राज्य गृहविभाग १८ हजार पदे भरणार

रत्नागिरी, ता. २४ ः जिल्ह्यात होणाऱ्या १३१ जागांसाठीच्या पोलिस भरतीकरिता ८ हजारांहून अधिक ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राज्यात एकाचवेळी भरती होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीसह अनेक भागांत मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग भरतीची तयारी करताना दिसत आहे.
राज्यात गृहविभागाने तब्बल १८ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात १३१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात खुल्या वर्गासाठी १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय १८ ते ३३ वर्षे वयाची अट आहे. राज्यात एकावेळी भरती होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोकणात जिल्ह्यानिहाय ठाणे ग्रामीण ६८, रायगड २७२, पालघर २११, सिंधुदुर्ग ९९, रत्नागिरी १३१ जागांचा समावेश आहे. पोलिस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेक तरुणांनी यात निवड व्हावी यासाठी कसून सराव सुरू केला आहे. कोरोनाच्या कालावधीत दोन वर्षे भरती न झाल्याने या वेळी वयाची मर्यादाही वाढवून देण्यात आली होती. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे ८ हजार अर्ज दाखल झाले आहेत.