अधिकारांचा प्रभावीपणे वापर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकारांचा प्रभावीपणे वापर करा
अधिकारांचा प्रभावीपणे वापर करा

अधिकारांचा प्रभावीपणे वापर करा

sakal_logo
By

70710
सावंतवाडी ः जनजागृती कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश डी. बी. म्हालटकर.

अधिकारांचा प्रभावीपणे वापर करा

डी. बी. म्हालटकर ः सावंतवाडीत ग्राहक दिन उत्साहात

सावंतवाडी, ता. २४ ः ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला आहे. हा कायदा १९८६ नंतर आणखीन प्रभावी करण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार सुधारणा करून ग्राहकांना संरक्षण दिले गेले; मात्र तरीही ग्राहक राजा आपल्या हक्कांबाबत अजूनही उदासीन असल्याचे दिसते. ग्राहकांनी कायद्याने दिलेल्या अधिकारांचा सजगतेने व प्रभावीपणे वापर करून आपली होणारी फसवणूक थांबवायला हवी, असे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव व न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व पंचम खेमराज विधी महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमच्या सुरुवातीला चार्टर्ड अकाउंटंट व रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष सुधीर नाईक यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व विशद केले. अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विधीज्ञ नकुल पार्सेकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मितीमागचा इतिहास सविस्तरपणे मांडला. आपल्या दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात आपण कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करताना वस्तूची गुणवत्ता, मोजमाप, दर याबाबत सगळ्या बाबी पारखून खरेदी केली पाहिजे. ऑनलाईन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने खबरदारी घेण्याबाबत सुतोवाच केले. यावेळी सतत सात वर्षे ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचा अशासकीय सदस्य म्हणून काम करत असताना आलेले अनुभवही त्यांनी कथन केले.
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या विधीज्ञ अश्विनी लेले यांनी आजच्या डिजिटल व ग्लोबल युगात ग्राहक न्यायालयाची गरज व जबाबदारी याबाबत माहिती दिली. ग्राहक मंचाची संरचना, अधिकार व कार्यपद्धती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीज्ञ पूजा जाधव नाईक यांनी केले.