एकांकीकेमुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकांकीकेमुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ
एकांकीकेमुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ

एकांकीकेमुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ

sakal_logo
By

70713
कणकवली : येथील नाथ पै एकांकिका स्पर्धेचे उद्‌घाटन प्रवीण भोळे यांनी केले. शेजारी वामन पंडित, दामोदर खानोलकर, ॲड. नारायण देसाई, प्रा.अनिल फराकटे आदी.


एकांकीकेमुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ

प्रवीण भोळे : आचरेकर प्रतिष्‍ठानच्या स्पर्धेचा प्रारंभ

कणकवली, ता.२४ : सलग ४५ वर्षे एकांकिका स्पर्धा भरवणं हे सोपं काम नाही. प्रतिष्‍ठानच्या या उपक्रमामुळे अनेक प्रायोगिक नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर पोचली. तसेच सिंधुदुर्गसह राज्‍यातील अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित केंद्राचे संचालक प्रवीण भोळे यांनी केले.
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या ४५व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ प्रतिष्‍ठानच्या रंगमचावर झाला. भोळे यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्‌घाटन केले. यावेळी नाट्य समीक्षक अरुण घाडीगावकर, आचरेकर प्रतिष्ठानचे कार्यवाह वामन पंडित, अ‍ॅड. नारायण देसाई, उमेश वाळके, प्रसन्ना देसाई, लीना काळसेकर, स्मिता कोरगावकर, अमोल खानोलकर आदी उपस्थित होते.
श्री. भोळे म्हणाले, ‘‘मराठी रंगभूमीला १७२ वर्षांची परंपरा आहे. मराठी रंगभूमीने आजवर देशाला प्रतिभावंत कलाकार दिले आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. व्यावसायिक नाटके, समांतर नाटके आणिं एकांकिका स्पर्धेमुळे नवोदित कलाकाराला नाट्यक्षेत्रात काम करण्याची उर्जा आणि उत्तेजन मिळत असते. कलाकार आपल्या अभियानातून रसिकांवर मोहिनी घालत असतो. नाटक या कलेमुळे कलाकारांचा व्यक्तिमत्त्व विकास घडून येत असतो. कलाकाराला आपल्या अभिनय सादर करता यासाठी नाट्य व एकांकिका स्पर्धा सातत्‍याने होणे गरजेचे आहे.’’ नारायण देसाई यांनी स्वागत केले. अनिल फराकटे यांनी आभार मानले.