रत्नागिरी ः सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 5 लाख खर्चाची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 5 लाख खर्चाची तयारी
रत्नागिरी ः सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 5 लाख खर्चाची तयारी

रत्नागिरी ः सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 5 लाख खर्चाची तयारी

sakal_logo
By

KOP18I14950

सांस्कृतिक कार्यक्रमास
५ लाख खर्चाची तयारी
रत्नागिरी पालिका ; कर्मचाऱ्यांच्या पगारात मात्र अनियमितता
रत्नागिरी, ता. २४ ः येथील नगर पालिकेच्या पाणी विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सर्व विभागाचा नियमित पगार होत असताना या विभागाच्या ४० कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये प्रचंड अनियमितता आहे. गेल्या महिन्यातील पगार तर अद्याप झालेला नाही. पालिका आर्थिक अडचणीत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ५ लाख रुपये खर्च करण्यास निधी उपलब्ध होतो; परंतु कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्यास निधी उपलब्ध होत नाही, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.
रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. पालिकेच्या हेडमध्ये पैसे नसतानाही अतिरिक्त विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे थोडा थोडका नाही तर तब्बल ३२ कोटीचा बोजा पालिका प्रशासनावर आहेत. त्यामुळे अनेक विकासकामांना आता ब्रेक लागला आहे. या परिस्थितीतही पालिकेने कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुमारे ५ लाखाची तरतूद केल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व गोष्टी घडत असताना पालिकेच्या पाणी विभागाच्या ४० कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मात्र प्रचंड अनियमितता आहे. या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार का केला जात नाही, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे.