खेड ः शिक्षण मतदार संघाचा आमदार शिक्षकच असावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः शिक्षण मतदार संघाचा आमदार शिक्षकच असावा
खेड ः शिक्षण मतदार संघाचा आमदार शिक्षकच असावा

खेड ः शिक्षण मतदार संघाचा आमदार शिक्षकच असावा

sakal_logo
By

rat२४२३.txt

( पान २ साठीमेन)

आमदार शिक्षकच असावा

धनाजी पाटील; शिक्षण मतदार संघ निवडणूक ; शिक्षकांना न्याय देणार

सकाळ वृत्तसेवा ः
खेड, ता. २३ ः आगामी शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये निवडून जाणारा प्रतिनिधी हा शिक्षक चळवळीतील कार्यकर्ता असल्यास अधिक जोमाने व अभ्यासू पद्धतीने काम करता येते, अशीच भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. भूतकाळात आलेला अनुभव पाहता शिक्षकांमध्ये ही भावना जोराने मूळ पकडत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे प्रतिपादन धनाजी पाटील यांनी केले.
शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार धनाजी पाटील जिल्हा दौरा करून आल्यावर येथे बोलत होते. पत्रकाराना माहिती देताना ते म्हणाले, शिक्षक संच मान्यतेतील जाचक अटी रद्द करून २८ ऑगस्ट २०१५ पूर्वीची संच मान्यता स्थिती कायम करावी या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विशेषतः कोकण विभागासारख्या डोंगरी व ग्रामीण भागासाठी विद्यार्थी पटसंख्या व त्यानुसार शिक्षकांचे प्रमाण याबाबत असलेली सध्याची जाचक तरतूद दुरुस्त व्हाव्यात. डोंगरी, ग्रामीण व शहरी असे स्वतंत्र निकष असावेत, शाळा तिथे मुख्याध्यापकपद आवश्यक असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानी राहायचे बंधन असू नये, अशी आग्रही मागणी करतानाच वास्तविक शालेय कामकाज समाधानकारकरित्या होते की नाही याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण विभागातील संपर्क दौऱ्यामध्ये शिक्षकवर्गाकडून विविध प्रकारच्या समस्या मांडल्या गेल्या आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने शासकीय व खासगी अनुदानित आश्रम शाळा कार्यरत आहेत; मात्र अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावरच शिक्षक काम करतात. शेकडो शिक्षकांचा शिक्षणसेवक पदाचा कार्यकाल संपून सुमारे पाच -सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. याबाबत नियमित वेतनश्रेणीचा विहित प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे सादर केला आहे; मात्र त्यांना नियमित शिक्षक म्हणून वेतनश्रेणीही दिली जात नाही. शिक्षणसेवकाचे मानधनही अदा केले जात नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. याबाबतही शिक्षकभारतीने पुढाकार घेत न्याय मिळवण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू केला आहे.
कोट ः
निव्वळ वेतन अनुदान कमी करण्याकडे कल
आगामी शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये निवडून जाणारा प्रतिनिधी हा शिक्षक चळवळीतील कार्यकर्ता असल्यास अधिक जोमाने व अभ्यासू पद्धतीने काम करता येते, अशीच भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
धनाजी पाटील