संगमेश्वर ः नेत्रावती व मत्स्यगंधाला संगमेश्वर स्थानकात थांबा द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः नेत्रावती व मत्स्यगंधाला संगमेश्वर स्थानकात थांबा द्या
संगमेश्वर ः नेत्रावती व मत्स्यगंधाला संगमेश्वर स्थानकात थांबा द्या

संगमेश्वर ः नेत्रावती व मत्स्यगंधाला संगमेश्वर स्थानकात थांबा द्या

sakal_logo
By

नेत्रावती, मत्स्यगंधाला
संगमेश्वर स्थानकात थांबा द्या

रेल्वेमंत्री वैष्णव यांना साकडे; खासदार राऊत यांनी घेतली भेट
संगमेश्वर, ता.२४ ः कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती व मत्स्यगंधा या दोन्ही गाड्याना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड या रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, या मागणीसाठी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेत लेखी निवेदन दिले.
कोकणातील विषेशतः सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांप्रती सदैव सजग असलेले आणि त्या समस्या सोडवण्यास कटिबद्ध असलेले खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा क्षेत्रातील जनतेची मागणी लक्षात घेत ती पूर्णत्वास नेण्यासाठी जातीने लक्ष देत ही समस्या मार्गी लागावी व जनतेची सोय व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे.
संगमेश्वर रोड हे अत्यंत महत्वाचे रेल्वेस्थानक असून या स्थानकातून लोक वैद्यकीय उपचार, व्यवसाय आदींकरिता मुंबईकडे जात-येत असतात. त्यामुळे प्रतिमहिना मोठ्या प्रमाणात या स्थानकातून रेल्वेला महसूल प्राप्त होतो हे वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. या स्थानकावर फारच कमी गाड्या थांबत असल्यामुळे सामान्य जनतेला रेल्वे आरक्षण मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी व काही संघटनांनी स्थानकावर दोन्ही ट्रेनना कायमस्वरूपी थांबा मिळण्याबाबतची सततची मागणी कोकण रेल्वेकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. सर्व कागदपत्र ही मंत्र्यांना देऊन लवकारात लवकर या दोन्ही गाड्याना संगमेश्वर स्थानकात थांबा देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे.