भिकाजी कोपकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिकाजी कोपकर यांचे निधन
भिकाजी कोपकर यांचे निधन

भिकाजी कोपकर यांचे निधन

sakal_logo
By

70748
भिकाजी कोपकर
बांदा, ता. २४ ः तळकट येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक भिकाजी गोपाळ कोपकर (वय ७१) यांचे निधन झाले. कोपकर गुरुजी हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे वडदहसोळ तसेच दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, शिरवल, तळकट, फुकेरी, कुंब्रल आदी भागात त्यांनी विद्यादानाचे काम केले. निगुडेच्या ग्रामसेविका तन्वी गवस, मालवण आगारातील अभियंते अनंत कोपकर, योगेश कोपकर यांचे ते वडील, निवृत्त पोलिस अधिकारी अरुण कोपकर यांचे भाऊ, तर कळणे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक तानेश्वर गवस यांचे सासरे होत.
--
70747
विद्यानंद बांदेकर
सावंतवाडी, ता. २४ ः शहरातील बांदेकर मेडिकल स्टोअर्सचे मालक विद्यानंद अशोक तथा नंदू बांदेकर (वय ५१, सालईवाडा) यांचे निधन झाले. जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ते सक्रीय सभासद होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. विशाल बांदेकर यांचे ते भाऊ, तर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे भावोजी होत.