चिपळूण-चिपळुणातील सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चिपळुणातील सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ
चिपळूण-चिपळुणातील सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ

चिपळूण-चिपळुणातील सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ

sakal_logo
By

चिपळुणातील सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ

घंटागाडीवर भिरकवला दगड ; तरुणाला अटक
चिपळूण, ता. २४ ः शहरातील कचरा जमा करणाऱ्या नगरपालिकेच्या घंटागाडीवरील स्पिकरच्या आवाजामुळे एक तरूण संतापला. रागाच्या भरात या तरुणाने गाडीवरील सफाई कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून गाडीवर दगड भिरकावरला. शनिवारी (ता. २४) शहरातील पेठमाप येथे हा प्रकार घडला. यापकरणी त्या तरुणावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर दिवसभर पालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.
अरबाज इनायत मुकादम (पेठमाप- चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याची फिर्याद साहील मिलिंद कांबळे (वय २६, बावशेवाडी, चिपळूण) यांनी दिली आहे.
नगरपालिकेच्या घंटागाडीवरून ऑडिओ क्ल्पिद्वारे स्पिकराच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतची जनजागृती केली जाते. शनिवारी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास नेहमीपमाणे सफाई कर्मचारी साहील कांबळेसह चालक विक्रांत सावंत शहरातील पेठमाप येथे घंटागाडी घेऊन कचरा जमा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या गाडीवरील स्पिकरच्या आवाजामुळे अरबाज मुकादम याची झोप मोडल्याने रागाने तो घराबाहेर आला. त्याने कांबळेसह सावंत याला शिवीगाळ केली. स्पिकर बंद करण्यास सांगत आमच्या दारापुढे गेल्यानंतर स्पिकर चालू कर व पुन्हा स्पिकरच्या आवाजाने माझी झोप मोडली तर मारून टाकीन, अशी धमकी दिली.
गाडीच्या पाठीमागे अरबाज याने रागाच्याभरात दगड भिरकावला. या घटनेनंतर त्या कर्मचाऱ्याने याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर ते चिपळूण पोलिस ठाण्यात आले होते. या प्रकरणी अरबाज याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेनंतर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी शहरातून फिरणाऱ्या घंटागाड्या दिवसभर बंद ठेवल्या होत्या.

चौकट
नागरिक दुर्गंधीमुळे हैराण
घटनास्थळी कचरा जमा करणारी घंटागाडी तशीच उभी करुन ठेवण्यात आल्याने रस्त्यालगत राहिणारे नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झाले होते. त्यानंतर काही तासाने ही घंटागाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आली होती.