उपसरपंचपदाची ३० ला निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंचपदाची 
३० ला निवडणूक
उपसरपंचपदाची ३० ला निवडणूक

उपसरपंचपदाची ३० ला निवडणूक

sakal_logo
By

उपसरपंचपदाची
३० ला निवडणूक
सावंतवाडी, ता. २४ ः तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. आता थेट सरपंचांची पहिली सभा व उपसरपंच निवड एकाच वेळी ३० डिसेंबरला सकाळी अकराला होणार आहे. ५२ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा सरपंचांचा कार्यकाल ३० डिसेंबरला संपत आहे. त्याच दिवशी थेट निवडून आलेले सरपंच आपला पदभार स्वीकारणार आहेत. याचवेळी उपसरपंच निवड होणार आहे. उपसरपंच कुठल्या पक्षाचे बसतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपल्या निवडून आलेल्या सदस्यांना सावध करण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने उपसरपंच आपल्या पक्षाचा बसवण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करीत आहेत. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक ३० डिसेंबरला होणार असल्याचे निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी लता वाडकर व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी स्पष्ट केले.