युवकांच्या प्रसंगावधानामुळे मालवणात पर्यटकास जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांच्या प्रसंगावधानामुळे
मालवणात पर्यटकास जीवदान
युवकांच्या प्रसंगावधानामुळे मालवणात पर्यटकास जीवदान

युवकांच्या प्रसंगावधानामुळे मालवणात पर्यटकास जीवदान

sakal_logo
By

युवकांच्या प्रसंगावधानामुळे
मालवणात पर्यटकास जीवदान
मालवण, ता. २४ : शहरातील भरड नाक्यावर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा सामना करत चिवला बीच येथील युवकांनी हृदयविकाराचा झटका आलेल्या पर्यटकाला दुचाकीवरून घेऊन जात खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना सायंकाळी घडली. त्या पर्यटकाचे प्राण वाचल्याने पर्यटक व्यावसायिक युवकांचे त्याच्या नातेवाईकांनी आभार मानले.
ख्रिसमस सुटीनिमित्त मालवणात पर्यटकांची गर्दीचे चित्र आहे. मालवण भरड नाक्यावर आज सायंकाळी मोठ्या प्रमाणात दुतर्फा गाड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यातच काही युवक दुचाकीने हृदयविकाराचा झटका आलेल्या तरुणाला घेऊन जात होते. युवकांची एक दुचाकी इतर वाहनांना बाजूला करत होती. वाहतूक पोलिस गुरुनाथ परब यांनी काही वाहनांना बाजूला करून युवकांची दुचाकी सुखरूप बाहेर काढली. हृदयविकाराचा झटका आलेल्या त्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले. आता त्याची प्रकृती सुधारत आहे. चिवला बीच येथील पर्यटन व्यावसायिक युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्या पर्यटकाचे प्राण वाचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आभार मानले. हा पर्यटक हा बीड येथील आहे.