
खर्डेकर महाविद्यालयाचे परबवाडात एनएनएस शिबिर खर्डेकर महाविद्यालयाचे परबवाडात एनएनएस शिबिर
टीपः swt२४.jpg मध्ये फोटो आहे.
परबवाडा ः राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिराचे उद्घाटन सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाले.
खर्डेकर महाविद्यालयाचे
परबवाडात एनएनएस शिबिर
वेंगुर्ले, ता. २४ ः येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिराला परबवाडा ग्रामपंचायत येथे प्रारंभ झाला. सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते माई परब यांच्या निवासस्थानी वृक्षारोपणाने शिबिराला प्रारंभ झाला.
प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी पंच सदस्य पपू परब, हेमंत गावडे, संतोष सावंत, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, अरुणा गवंडे, सुहिता हळदणकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, माजी सरपंच आपा पवार, माजी उपसरपंच संजय मळगावकर, विश्वास पवार, प्रा. आनंद बांदेकर, प्रा. व्ही. ए. पवार, कार्यक्रम अधिकारी व्ही. व्ही. सावंत यांच्यासह उदय सावंत, गजानन सावंत, अनिल गवंडे, जीवन परब आदी उपस्थित होते. सरपंच बांदेकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या, तर विष्णू परब यांनी महाविद्यालयीन जीवनातील स्वतःचे अनुभव सांगितले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब यांनी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले, तर प्राचार्य देऊलकर यांनी शिबिराचे महत्त्व सांगून शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन केले. प्रा. नंदगिरीकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. चुकेवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. व्ही. एस. चव्हाण यांनी आभार मानले.