प्रगतीसाठी सांघिक कार्य महत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रगतीसाठी सांघिक कार्य महत्त्वाचे
प्रगतीसाठी सांघिक कार्य महत्त्वाचे

प्रगतीसाठी सांघिक कार्य महत्त्वाचे

sakal_logo
By

70845
कुडाळ ः आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाचे‌ उद्‍घाटन करताना कमलाकर दाभोलकर. शेजारी उमेश गाळवणकर, शुभांगी लोकरे, अरुण मर्गज, परेश धावडे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)


प्रगतीसाठी सांघिक कार्य महत्त्वाचे

दाभोलकर ः ‘नाथ पै’ स्कूलचा कुडाळात क्रीडा महोत्सव

कुडाळ, ता. २५ ः सांघिकता खेळ घडवते. सांघिक प्रयत्नाने देशही घडतो. प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीसाठी सांघिक कार्य महत्त्वाचे असते. खेळ तर त्याच्या उपयोजनाचे महत्त्वाचे क्षेत्र आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार कमलाकर दाभोलकर यांनी केले. ते येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी दाभोलकर यांनी कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेताना जय-पराजय खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याची मानसिकता स्पर्धेला निकोपता बहाल करते. आपल्यातील सुप्त गुण झाकून न ठेवता त्या अशा प्रकारच्या स्पर्धांतून प्रकाशात आणावेत. जेणेकरून अभ्यासासह इतर क्षेत्रांतही नावलौकिक वाढविता येतो, असे सांगत क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संस्थाचालक उमेश गाळवणकर, सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूलचा सर्व शिक्षक वृंद, क्रीडाशिक्षक विक्रम सिंह यांचे अभिनंदन करून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन गाळवणकर, जीएसटी विभागाचे डेप्युटी कमिशनर खोबरेकर, डॉ. गुरुप्रसाद सौदत्ती, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे, उपप्राचार्य विभा वझे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना भंडारी, महिला रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, क्रीडाशिक्षक विक्रम सिंह आदी उपस्थित होते. प्रा. अरुण मर्गज यांनीही मनोगत व्यक्त केले. शुभांगी लोकरे यांनी प्रास्ताविक केले. पौर्णिमा ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.
................
चौकट
विद्यार्थ्यांचे तालबद्ध संचलन
यावेळी गणेश वंदना व कथ्थक आदी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. लाल घर, हिरवे घर व पिवळे घर अशा विविध विभागांत सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी तालबद्ध संचलन केले. टॉस उडवून कबड्डीचे उद्‍घाटन करण्यात आले. विद्यार्थी उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले. सहभागी आणि विजयी स्पर्धकांना विशेष बक्षीस समारंभामध्ये गौरविण्यात येणार आहे.