सदर ः संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षणपद्धती गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षणपद्धती गरजेची
सदर ः संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षणपद्धती गरजेची

सदर ः संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षणपद्धती गरजेची

sakal_logo
By

rat2513.txt

बातमी क्र..13 ( टुडे पान 3 साठी, सदर)

फोटो ओळी
-rat25p2.jpg ः डॉ. गजानन पाटील
-------
शिक्षण ः लोकल टू ग्लोबल ......................लोगो


प्राथमिक स्तरावर मुलांच्या मनातील काही संकल्पना त्यांना समजून देण्यासाठी आज काल डिजिटल मीडियांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे; पण दहा-पंधरा वर्षांपूर्वी अशा डिजिटल मीडियाचा विकास झाला नव्हता. जेव्हा हा मीडिया विकसित झाला नव्हता तेव्हा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा खडूफळ्याच्या माध्यमातून मुलांच्या संकल्पना समजून दिल्या जात होत्या. मग एखादा कल्पक शिक्षक मुलांना घेऊन क्षेत्रभेटीला जायचा. तिथे मुलांच्या संकल्पनेला आकार दिला जायचा. खरंतर मुलांच्या मनात अनेक समस्या, शंका-कुशंका, प्रश्न असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. जर उत्तरे मिळाली नाही तर मुल त्या विषयापासून परावृत होतं. कदाचित मुल कायमचेच त्या विषयाला मुकतं. पुढे त्याची त्या विषयाची अभिरूची संपते. असं शिक्षणात घडत असतं; पण ते बारकाईने आपण कधी पाहत नाही हे वास्तव आहे. अलिकडे यावर वेगवेगळ्या प्रकाराची संशोधनं जगभरात सुरू आहेत.

- डॉ. गजानन पाटील
---------------

संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षणपद्धती गरजेची

सन 2006 मध्ये डाएट यवतमाळला मी प्राचार्य म्हणून काम करताना याच विषयासंदर्भात संशोधन केले होते. डाएटला जोडून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असलेली शासकीय शाळा होती. ही शाळा म्हणजे आमची प्रचंड मोठी शिक्षण प्रयोगशाळा होती. एक दिवस माझ्या कार्यालयात तिसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा आला. तो म्हणाला, सर अन्नसाखळी म्हणजे काय? त्याला म्हणालो, उद्या परिपाठाला सांगेन तुला आणि सर्वांनाही. प्रश्न विचारल्याबद्दल त्याचं कौतुक केले. त्यानंतर सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली. दुसऱ्या दिवशी परिपाठाला आम्ही सर्वजण जमलो. सर्व मुलांसोबत अन्नसाखळीची संकल्पना समजून सांगायचं तर काय करता येईल यावर चर्चा केली. शेवटी एक प्रयोग करायचा ठरला. त्यानुसार पहिली ते चौथीच्या मुलांना सोबत घेऊन कर्मचाऱ्यांकडून कार्यालयासमोर दहा बाय पाच बाय पाच फुटाचा खड्डा काढला. त्या खड्ड्यात प्लास्टिक कापड टाकले. नंतर त्यात पाणी भरले. दोन दिवसांनी त्यात मोठे मासे, छोटे मासे, लहान-मोठी बेडकं सोडली. शेवाळ टाकले. मुलांना प्रथम काहीच कळेना. दहा-पंधरा दिवस मुलं सकाळी शाळेत आल्यावर निरीक्षण करत होती. पंधरा दिवसांनी मुलांनी जे निरीक्षण केले ते ते त्यांनी सांगितलं. त्यात छोटी बेडकं पाण्यावरचे किडे कसे खातात, मोठे मासे छोट्या बेडक्या कशा खातात, लहान मासे शेवाळ कसे खातात हे सांगितलं. मुलांच्या निरीक्षणावरून चौथीतल्या मुलांनी त्याचे विश्लेषण करून अन्नसाखळीची संकल्पना समजून सांगितली. ज्या मुलाने प्रश्न विचारला होता त्याला ही संकल्पना इतकी पक्की समजली की, पुढे त्याने डाएटला भेट देण्यासाठी आलेल्या मंडळींना अन्नसाखळीचा हा प्रयोग समजून सांगत होता. या प्रयोगाने आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की, मुलांना कोणतीही संकल्पना समजून द्यायची असेल तर पुस्तकांवर किंवा अभासी डिजिटल मीडियावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. मुलांना शाळेच्या प्रांगणात किंवा आजुबाजूच्या परिसरात नेऊन त्यांच्या संकल्पना त्यांच्याच भाषेत समजून देणं गरजेचं आहे. मुलाला जेव्हा वाटेल ही संकल्पना मला समजली तर ती संकल्पना त्याला आयुष्यभर लक्षात राहाते आणि आपण परीक्षेपुरती तोंडपाठ करून घेतली तर ती त्या इयत्तेच्या वर्गापुरतीच लक्षात राहते. पुढे प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा काहीच उपयोग होत नाही. असं आपल्या जीवनात बर्‍याचवेळा घडून गेलं असल्यामुळे आज आपणास काही संकल्पना नीट समजून देता येत नाहीत. भविष्यात मुलांच्या आयुष्यात असं घडू नये म्हणून शाळा -महाविद्यालयात मुलांना मुळ संकल्पना स्पष्ट करूनच पुढे जावे. तरच उद्याचा विद्यार्थी समस्या सोडवणारा संशोधक बनून देशाचा विकास करू शकेल. पाश्चात्य राष्ट्राप्रमाणे संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षणपद्धतीचा वापर करणे आज गरजेचे आहे.

( लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत .)