रत्नागिरी- 1 जानेवारीला मोफत तपासणी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- 1 जानेवारीला मोफत तपासणी शिबीर
रत्नागिरी- 1 जानेवारीला मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी- 1 जानेवारीला मोफत तपासणी शिबीर

sakal_logo
By

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये
रविवारी मोफत तपासणी शिबिर
रत्नागिरी, ता. २५ : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या पुन्हा एकदा वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. १ जानेवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत शिबिर होणार आहे.
सन २०१४ मध्ये कोकणातील पहिले अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर सुरू झाले आहे. रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर सुरू झाल्यापासून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील धन्वंतरी रुग्णालयातील या रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून डॉ. तोरल शिंदे या मोफत तपासणी शिबिर घेत असत. त्याचा लाभ सुद्धा अनेक महिलांना झाला आहे.
डिसेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा ही मोफत शिबिरे सुरू झाली. डॉ. शिंदे या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. पीसीओडी संदर्भातील समस्या, गर्भनलिका तपासणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, शुक्राणूंची संख्या व हालचाली कमी, लैंगिक समस्यांवर डॉ. शिंदे मोफत मार्गदर्शन करतात.