पावस-पावस, गोळप गटात विकासासाठी निधी कमी पडणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-पावस, गोळप गटात विकासासाठी निधी कमी पडणार नाही
पावस-पावस, गोळप गटात विकासासाठी निधी कमी पडणार नाही

पावस-पावस, गोळप गटात विकासासाठी निधी कमी पडणार नाही

sakal_logo
By

दोन्ही फोटो आवश्‍यक
फोटो ओळी
-rat२५p८.jpg-KOP२२L७०८६१ पावस ः सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाढदिवसानिमित्त लहान मुलांसह केक कापला.
-rat२५p९.jpg-KOP२२L७०८६२ पावस ः गावखडी येथील महिलांचे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात स्वागत करताना उदय सामंत.


पावस, गोळप गटात विकासासाठी निधी कमी पडणार नाही
मंत्री उदय सामंत ; उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गौरव
पावस, ता. २५ ः जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे जिल्ह्यामध्ये विकासकामे करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पावस, गोळप जिल्हा परिषद गटामध्ये विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच बचत गटांच्या महिलांना एका वर्षामध्ये त्यांना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याकरिता त्यांच्या मालाला विक्री केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी चार कोटीचा निधी देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पावस व गोळप जिल्हा परिषद गटाच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमांतर्गत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शालेय विद्यार्थी, माजी सैनिक व गृहिणी यांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने संघटन कौशल्य दाखवून आपले वर्चस्व दाखवण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून बाळासाहेबांची शिवसेना यांचेच वर्चस्व राहील, असे सामंत यांनी सांगितले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावखडी-शिवगणवाडी येथील महिलांनी ठाकरे सेनेतून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमध्ये प्रवेश केला. तसेच गावडेआंबेरे ग्रामपंचायतीचे ठाकरे सेनेचे नूतन सदस्य बळीराम डोंगरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला.
याप्रसंगी पावस व गोळप जिल्हा परिषद गटांमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, पावस विभागप्रमुख विजय चव्हाण, विभागप्रमुख नंदा मुरकर, युवासेना प्रमुख तुषार साळवी, उपविभाग प्रमुख प्रवीण शिंदे, सुनील नावले आदी उपस्थित होते.