राजकारणातील चाणाक्ष नेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकारणातील चाणाक्ष नेता
राजकारणातील चाणाक्ष नेता

राजकारणातील चाणाक्ष नेता

sakal_logo
By

70902
97676
पुरवणी डोके ः मंत्री उदय सामंत वाढदिवस विशेष
----------

राजकारणातील चाणाक्ष नेतृत्व

इंट्रो
राजकारणातील चाणाक्षता, अचूक टायमिंग साधल्यामुळे उदय सामंत यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाला गवसणी घातली. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांनी बहारदार कामगिरी बजावली आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या रुपाने कोकणच्या राजकारणात धडाडीचा कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोहोचला आहे. कोकणात राणे, गीते, तटकरे यांच्या कारकीर्दीनंतर खऱ्या अर्थाने आपला शिक्का आजमावला असेल तर तो उदय सामंत यांनी. सहसा कोणत्याही वादात न अडकण्याचे त्यांचे कसब आणि नशीबाने त्यांना नेहमी साथ दिली आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी पटापट राजकीय पायऱ्या चढताना विरोधकांनाही गहिरे पाणी दाखविले आहे. एखाद्या उमद्या कार्यकर्त्याने जिल्ह्यात अल्पावधीतच राजकीय एकछत्री अंमलबजावणी करण्याचे सामंत हे अस्सल उदाहरण होय. त्यांच्या रुपाने कोकणाला आणि रत्नागिरीला अजून एक कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.
...................
असा हा राजकीय प्रवास...
उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात २००४ ते २०१९ या काळात एकहाती पकड बसवली. जिल्ह्यात तळागाळात कार्यकर्त्यांची फौज तयार करणारे नेते फार कमी असतात. त्यात सामंत यांचा वरचा क्रमांक लागतो. रत्नागिरीत त्यांचा एकछत्री अंमल आहे. शिवसेना वाढविण्यात त्यांचा मोठा हात असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी पक्षातून झाली. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून त्यांनी राजकारणाचा ‘श्रीगणेशा’ केला. त्याच भाजपसोबत सत्तेत असताना मंत्रिपदही भूषविले. सेना-भाजपचा मतदारसंघ म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेतृत्व असलेल्या उदय सामंत यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी या संधीचे सोने केले. आमदार म्हणून ते विजयी झाले. दहा वर्षांनंतर त्यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ केले आणि शिवसेनेचा भगवा हाती धरला. त्यानंतर त्यांची राजकीय घौडदौड कायम राहिली. शिवसेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्यांनी अचूक टायमिंग साधले. युतीच्या काळात त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा आल्यानंतर महाविकास आघाडीतही मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. आताही त्यांनी योग्य टायमिंग साधत शिंदे गटाचा हात धरला आणि त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ आपसूकच पडली.
...................
शिंदे गटात शेवटच्या क्षणी
जून महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडात त्यांना आमदारांनीच नाही, तर मंत्र्यांनीही साथ दिली होती. सुरुवातीला सुरत येथे असलेल्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये उदय सामंत यांचा सहभाग नव्हता. ते शिवसेना सोडून जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त होत होता. गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यावर शिवसेनेची भिस्त होती. शिंदेंचे बंड फसणार, असे भाकित वर्तवण्यात येत होते. शिवसेनेने बंड थोपविण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत हे दोन्ही नेते उपस्थित होते; पण नंतर दोघेही ‘नॉट रिचेबल’ झाले. उदय सांमत २६ जूनला ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर विमानाने थेट गुवाहाटीत पोहोचले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. कोकणात शिवसेनेला खिंडार पाडण्यात केसरकरांनंतर सामंत यांनी हातभार लावला.