संक्षिप्त-ज्यूदो स्पर्धेत तन्वी पवारचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-ज्यूदो स्पर्धेत 
तन्वी पवारचे यश
संक्षिप्त-ज्यूदो स्पर्धेत तन्वी पवारचे यश

संक्षिप्त-ज्यूदो स्पर्धेत तन्वी पवारचे यश

sakal_logo
By

ज्यूदो स्पर्धेत तन्वी पवारचे यश
कणकवली ः दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी पुणे-बालेवाडी येथे झालेल्या ट्रायल स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आझाद ज्युदो असोसिएशन, फोंडाघाटच्या तन्वी पवार हिने ज्युदो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विजय संपादन केला. तिची दिल्ली येथे होणाऱ्या ज्यूदो खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबाबत तन्वी हिच्यावर फोंडाघाट परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तुळसला बुधवारी रस्सीखेच स्पर्धा
वेंगुर्ले ः तुळस वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने व सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने पुरुष रस्सीखेच स्पर्धा आणि शालेय गटासाठी (मुले) स्पर्धेचे आयोजन बुधवारी (ता. २८) श्री जैतीर मंदिर तुळसच्या मैदानावर दुपारी ४ वाजता केले आहे. खुला-पुरुष गटासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे ४०००, २००० रुपये, प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र, शालेय गटासाठी १०००, ७०० रुपये, प्रत्येकी चषक आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. खुला पुरुष गट स्पर्धेतील बेस्ट फ्रंट मेन आणि बेस्ट लास्ट मेन यासाठी प्रत्येकी रोख ५०० रुपये, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी ओळखीसाठी पुरावा म्हणून आधारकार्ड आणणे बंधनकारक आहे. इच्छुक संघानी अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा.

मिठबाव मंदिरातील दानपेटी फोडली
देवगड ः तालुक्यातील मिठबाव-जेठेवाडी येथील कुलस्वामिनी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून त्यातील सुमारे दोन हजाराची रोकड लंपास केली. तर मिठबाव-फाटकवाडी येथील दोन मंदिरांमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी ६.४५ ते २४ रोजी डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या कालावधीत घडली. देवगड पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी मंदिरातील पुजाऱ्यांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी मिठबाव-फाटकवाडी येथील मंदिर कमिटीचे अध्यक्ष दिवाकर फाटक यांना याबाबत माहिती दिली.